मुंबई: सरकारी नोकरीच्या शोधात असाल (Sarkari Job) तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून (Staff Selection Commission ) जारी करण्यात आलेल्या पीएसआय पदाच्या (PSI) 4,187 जागांच्या जाहिरातीसाठी अर्ज करण्यासाठी आता फक्त तीनच दिवस उरले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 28 मार्च शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांना घाई करावी लागेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी स्टाफ सिलेक्सन कमिशनच्या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in/login या वेबसाईटला भेट द्या.
स्टाफ सिलेक्शन कमिशन
पदाचे नाव - सब इन्सपेक्टर, दिल्ली पोलीस आणि CAPF
परीक्षा फी - 100 रुपये, महिला अनुसूचित जाती जमाती तसेच माजी सैनिकांना परीक्षा फी नाही.
फी कशी भरणार - ऑनलाईन पद्धतीने फी भरता येते. भीम यूपीआय, नेट बँकिंग, मास्टरकार्ड, रुपे क्रेडिट.
महत्त्वाच्या तारखा -
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख- 04-03-2024
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28-03-2024
- ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 28-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
- ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 29-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
- 'अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो' आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याची तारीख - 30-03-2024 ते 31-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
- ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक - 9, 10 आणि 13 मे 2024
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा -
- किमान वय - 20 वर्षे
- कमाल वय - 25 वर्षे
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा 02.08.1999 च्या आधीचा आणि 01.08.2004 या तारखेनंतर नसावा.
पात्रता काय?
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असावी.
एकूण जागा -
- दिल्ली पोलीस पोलीस उपनिरीक्षक पुरूष - 125
- दिल्ली पोलीस उपनिरीक्षक महिला - 61
- CAPF मध्ये पोलीस उपनिरीक्षक - 4001
वजन आणि उंची किती असावी? शारीरिक चाचणी (PET) :
पुरुष उमेदवारांसाठी:
- 100 मीटर शर्यत 16 सेकंदात.
- 1.6 किलोमीटर धावणे 6.5 मिनिटांत.
- लांब उडी: 3 संधींमध्ये 3.65 मीटर.
- उंच उडी: 3 प्रयत्नांत 1.2 मीटर.
- शॉट पुट (16 पौंड): 3 प्रयत्नांमध्ये 4.5 मीटर.
महिला उमेदवारांसाठी
- 100 मीटर शर्यत 18 सेकंदात.
- 4 मिनिटांत 800 मीटरची शर्यत.
- लांब उडी: 3 संधींमध्ये 2.7 मीटर.
- उंच उडी: 0.9 मीटर 3 संधींमध्ये.
महिला उमेदवारांसाठी छातीच्या मोजमापाची किमान आवश्यकता नसेल.
3. वैद्यकीय मानके (सर्व पदांसाठी):
डोळ्याची दृष्टी: किमान जवळची दृष्टी N6 (चांगली नजर) आणि N9 (खराब नजर) असावी.
दोन्ही डोळ्यांची किमान अंतर दृष्टी 6/6 (चांगली नजर) आणि 6/9 (खराब नजर) असली पाहिजे.
ही बातमी वाचा :