पुणे : बारामतीतून लोकसभा निवडणूक (Baramati Lok Sabha Election 2024) लढण्याचा पक्का निर्धार शिंदे गटाचे (Shinde Group) नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. मी निवडणूक लढणारच, मी माघार घेणार नाही, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र राजकीय आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यातीलच एक मतदार संघ म्हणजे बारामती. 


बारामतीतून लढण्यावर विजय शिवतारेंचा पक्का निर्धार


बारामतीमध्ये सध्या विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार असा वाद उफाळून येताना दिसत आहे. बारामतीमध्ये महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित आहे. मात्र, असं असलं तरी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम आहेत. विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. 


बारामतीत विजय शिवतारेंकडून प्रचार सुरु


विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन भेटीगाठी घेत आहेत एक अर्थाने ते प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजवल्यानंतर देखील विजय बापू शिवतारे लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत. पुण्यातील कात्रज आंबेगाव नरे हा सगळा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. या परिसरात विजय शिवतारे प्रचार करत आहेत.


मी निवडणूक लढणारच, आता माघार नाही


मी निवडणूक लढवणार, याच्यावर मी ठाम आहे. कुणीही मला काहीही सांगू द्या. मी अजित पवारांना कधीच माफ केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना ना सुप्रिया सुळे यांना मत द्यायचंय, ना अजित पवारांना मत द्यायचंय, मग हे मतदार जाणार कुठे असा सवाल शिवतारेंनी उपस्थिती केला आहे. ते पुढे म्हणाले की, अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांनी याचा विचार करावा, अनेक जण इच्छुक आहेत. हर्षवर्धन पाटलांचं मला माहित नाही, पण मी माघार घेणार नाही.


विजय शिवतारेंची 1 एप्रिलला जाहीर सभा


शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी अजित पवार गटातील लोकांकडून होत आहे. मी विरोधक आहे, ते मागणी तर करणारंच, असं शिवतारेंनी म्हटलं आहे. विजय शिवतारे 1 तारखेला जाहीर सभा घेणार आहेत. पालखीतळ मैदान सासवड या ठिकाणी शिवतारेंची जाहीर सभा होणार आहे. आता या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Vijay Shivtare : मी धर्मयुद्ध स्वीकारलंय; झुंडशाही, पवार पर्व संपवण्यासाठीची लढाई; विजय शिवतारेंनी अखेर रणशिंग फुंकले!