SECL Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या अल्पशिक्षित उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने (SECL - South Eastern Coalfields Limited) 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या भरतीद्वारे सरफेस मायनर ऑपरेटर पदांवर भरती केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 12 एप्रिल 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट secl-cil.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईत अर्जाची प्रत जमा करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2022 आहे. या भरती अंतर्गत अनेक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 मार्च 2022 पासून सुरू झाली आहे.
या भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा
- भरती प्रक्रियेसाठी अर्ज सुरु झाल्याची तारीख : 16 मार्च 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2022
रिक्त जागा
जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती अंतर्गत सरफेस मायनर ऑपरेटरच्या 17 पदांवर भरती केली जाईल.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
अशी असेल निवड प्रकिया?
या भरतीच्या पदांसाठी उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेसाठी प्रवेशपत्र आणि तारीख या संदर्भातील माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. भरतीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :
- Elon Musk : टेस्लाच्या एलन मस्कने ट्विटरमधील मोठ्या गुंतवणुकीनंतर पोल घेत विचारला प्रश्न, एडिट फिचरबाबत मांडा मत
- RCB VS RR : बंगलोर-राजस्थान आमनेसामने, आरसीबीच्या संघात मोठा बदल; कोण गाठणार विजयाचं लक्ष्य?
- Viral Video : आरशात स्वत:चेच प्रतिबिंब पाहून घाबरला कुत्रा, पुढे असं काही केलं की...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha