SBI Retired Officer Recruitment 2022: बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं एक चांगली संधी आणली आहे. इथे निवृत्त अधिकाऱ्यांच्या बंपर पदांसाठी भरती निघाली आहे. या रिक्त जागा विशेषतः सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी आहेत. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1438 पदं भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे. त्यांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत. हे करण्यासाठी, त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला sbi.co.in भेट द्यावी लागेल. 


अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली असून त्यांच्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे. SBI चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, SBI चे पूर्वीचे सहकारी बँक कर्मचारी या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.


भरतीसंदर्भातील इतर महत्त्वाचे तपशील 


SBI मधील या पदांबद्दल तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी, तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. हे करण्यासाठी, SBI ची अधिकृत वेबसाईट  sbi.co.in/careers ला भेट द्या. 


पात्रता काय?


SBI चे सेवानिवृत्त अधिकारी या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. उमेदवाराला या क्षेत्रातील अनुभव आणि संबंधित क्षेत्रात काम करण्याची क्षमता असावी. पदानुसार, आवश्यक कौशल्य आणि योग्यता देखील उमेदवारामध्ये असणं आवश्यक आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर, वयाच्या 60व्या वर्षी बँकेतून निवृत्त झालेले कर्मचारी अर्ज करू शकतात.


कशी केली जाणार निवड?  


भारतीय स्टेंट बँकेनं ज्या पदांवर भरती जाहीर केली आहे, त्या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. प्रथम त्यांना शॉर्टलिस्ट केलं जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत होईल. त्यावर 100 गुणांच्या आधारे उमेदवारांचं मुल्यांकन केलं जाईल. त्याचे पासिंग मार्क्स बँक ठरवणार. त्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असतील तर तरुण उमेदवाराला महत्त्व दिलं जाईल.


वेतन 


निवड झाल्यावर, उमेदवारांना पदानुसार वेतन मिळेल. लिपिक पदासाठी पगार 25,000 रुपये आहे. JMGS – I साठी 35,000 रुपये आणि MMGS – II आणि MMGS – III साठी 40,000 रुपये आहे. तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai IIT: आयआयटीची पोरं हुशार! मुंबई आयआयटीत भरघोस पॅकेज; एका विद्यार्थ्याला सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचा पगार, 25 विद्यार्थ्यांना एक कोटी...