Avatar 2 Collection : हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा (James Cameron) 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात या सिनेमाला यश आले आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 


'अवतार 2' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील! 


भारतीय बॉक्स ऑफिसवर 'अवतार 2' (Avatar 2) हा सिनेमा रिलीजच्या आठव्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. हा सिनेमा सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 206.85 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या आठव्याच दिवशी हा सिनेमा भारतात ब्लॉकबस्टर ठरला आहे. 






जाणून घ्या 'अवतार 2'चं कलेक्शन 


'अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 41 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 42 कोटी, तिसऱ्या दिवशी 46 कोटी, चौथ्या दिवशी 16.65 कोटी, पाचव्या दिवशी 15.75 कोटी, सहाव्या दिवशी 13.8 कोटी, सातव्या दिवशी 13.50 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने 190-193 कोटींटी कमाई केली आहे. 


'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. तसेच रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड मोडू शकतो. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 


'अवतार 2' या सिनेमाची निर्मिती 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींमध्ये करण्यात आली आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरॉनने (James Cameron) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


संबंधित बातम्या


Avatar 2 Box Office Collection: 'अवतार द वे ऑफ वॉटर' ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; सहाव्या दिवशी केली एवढी कमाई