SBI Recruitment 2022 : अनुभवी उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India Recruitment 2022) मध्ये नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आली आहे. येथे सेवानिवृत्त अधिकारी (SBI Retired Officers Recruitment 2022) पदासाठी बंपर भरती सुरू आहे. या पदांसाठी (SBI Bharti 2022) अर्ज प्रक्रिया 10 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 47 पदांची भरती केली जाणार आहे. 


वयोमर्यादा 


या पदांसाठी 60 ते 63 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. सेवानिवृत्त उमेदवारांकडे स्मार्ट मोबाइल फोन आणि पीसी/मोबाइल अॅप/लॅपटॉपद्वारे किंवा आवश्यकतेनुसार निरीक्षण करण्याचे कौशल्य असावे.


पात्रतेच्या अटी 


अर्जदार हा स्टेट बँक ऑफ इंडियाचाच निवृत्त अधिकारी असेल, त्यामुळे त्याला कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. संबंधित क्षेत्रात पुरेसा कामाचा अनुभव आणि एकूण व्यावसायिक क्षमता असलेल्या माजी अधिकाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल.


निवड प्रक्रिया


या पदांसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रिक्त पदांशी संबंधित सर्व तपशील वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.


कसा कराल अर्ज?  


SBI ची अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या.
आता रिटायर्ड बँक ऑफिसर रिक्रुटमेंटच्या लिंकवर क्लिक करा.
सर्वात आधी नोंदणी करा आणि आपले तपशील भरा.
अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
प्रिंटआउट काढा.





अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.





महत्त्वाच्या इतर बातम्या :