NCERT Jobs 2022 : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) नं भरतीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे असोसिएट प्रोफेसरसह 292 पदांची भरती केली जाईल. या मोहिमेसाठी भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत साईट https://ncert.nic.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवार 28 ऑक्टोबरपर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकतात.


रिक्त जागांचा तपशील 


या भरती मोहिमेद्वारे प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, लायब्रेरियन यासह 292 पदांची भरती केली जाणार आहे.


शैक्षणिक पात्रता


अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर/पीएचडी पदवी आणि इतर विहित पात्रता आणि कामाचा अनुभव असावा.


वेतन श्रेणी 


या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पोस्टानुसार 57,700/1,31,400/1,44,200 रुपये प्रति महिना मिळतील.


निवड प्रक्रिया 


शैक्षणिक पात्रतेच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. मुलाखतीला उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. निवडीशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, कृपया अधिकृत अधिसूचना पाहा.


अर्ज शुल्क 


भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 1000 रुपये अर्ज शुल्क जमा करावं लागेल. महिला अर्जदार आणि SC/ST/PWD मधील अर्जदारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केलं जाणार नाही. फी भरणं केवळ ऑनलाइन पद्धतीनं केलं जाऊ शकतं. 


अर्ज करण्याची शेवटची तारीख


भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ncert.nic.in या अधिकृत साईटला 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत भेट देऊन अर्ज करावा लागेल. 





अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.





महत्त्वाच्या इतर बातम्या :