SBI Jobs 2022: स्टेट बँक ऑफ इंडियानं भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार SBI मध्ये 65 पदांवर भरती होणार आहे. ही भरती मोहीम स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या भरतीसाठी घेण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत साईट sbi.co.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची नोंदणी प्रक्रिया 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.


​​SBI Recruitment 2022: रिक्त जागांचा तपशील 


स्टेट बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या या भरती मोहिमेद्वारे 65 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यापैकी 64 पदं व्यवस्थापक आणि 1 पद सर्कल सल्लागारासाठी आहे. 


​​SBI Recruitment 2022: पात्रतेचे निकष


या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार वेबसाईटवर उपलब्ध अधिकृत अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात. 


​​SBI Recruitment 2022: अशी होईल निवड


या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतींच्या आधारे केली जाईल. या पदांच्या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. काही पदांसाठी मुलाखत 100 गुणांची असेल. निवडीची गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमानं तयार केली जाईल.


​​SBI Recruitment 2022: अर्ज शुल्क 


या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क भरावे लागेल. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे. SC/ST/PWD उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. बँकेच्या करिअर वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या पेमेंट गेटवेद्वारे फी ऑनलाईन भरावी लागेल.


​​SBI Recruitment 2022: कसा करायचा अर्ज? 


या भरती मोहिमेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत साईटला भेट देऊन अर्ज करू शकतात आणि शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?