Job Majha : मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरीसाठी इच्छुक असाल तर यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे. तर टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2022 आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसासाठी वाट पाहू नका. अर्ज करण्यासंदर्भातील तपशील जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्या. 


IHM, मुंबई (इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट)


विविध पदांसाठी भरती होत आहे.


पोस्ट : सहाय्यक व्याख्याता-सह- सहाय्यक प्रशिक्षक


शैक्षणिक पात्रता : हॉस्पिटॅलिटी/पर्यटन या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा MBA (ii) 55% गुणांसह हॉटेल प्रशासन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / हॉटेल मॅनेजमेंट/हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशन / पाककला कला / पाककला विज्ञान यामधील डिप्लोमा/पदवी, NHTET


एकूण जागा : 8


पोस्ट : निम्न श्रेणी लिपिक


शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण, संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.


एकूण जागा : 7


पोस्ट : शिक्षक सहयोगी


शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन/हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी, 2 वर्षांचा अनुभव, NHTET उत्तीर्ण


एकूण जागा : 6


वयोमर्यादा : 28 ते 35 वर्ष


नोकरीचं ठिकाण : IHM मुंबई


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2022


तपशील : www.ihmctan.edu (या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


टाटा मेमोरियल सेंटर


विविध पदांच्या 164 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट : मल्टी-टास्किंग स्टाफ, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक समन्वयक (डेटा), तांत्रिक समन्वयक (वैद्यकीय), डेटा एंट्री ऑपरेटर, क्षेत्र अन्वेषक, संशोधन सहाय्यक, परिचारिका, रुग्ण सहाय्यक,
फार्मासिस्ट


शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, B.Sc नर्सिंग, BAMS, BDS, BHMS, डिप्लोमा, GNM, MCA, MDS प्रमाणपत्र/पदवी असणे आवश्यक आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.


एकूण जागा : 164


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2022


तपशील : tmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. advertisement number - HBCH & RC/ PROJECT/ 2022/ P011 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)



अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.