Central Railway : जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या व चौथ्या लाइनच्या कामासाठी जळगाव स्थानकात यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  5 व 6 डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मेगा ब्लॉकमुळे हावडा ते मुंबई मार्गावरील विदर्भ एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेस अप व डाऊन अशा 38 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पैकी 16 गाड्या जळगाव स्थानकातून जाणाऱ्या आहेत. रेल्वेकडून होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची मोठी तारांबळ होत आहे. रेल्वेला जनवाहिनी म्हणून ओळख आहे. परंतु मेगाब्लॉक आणि रिमोल्डींगच्या कामामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.


तीन तारखेला रद्द करण्यात आलेल्या रेल्वे -
19007, 01139,
चार तारखेला रद्द करण्यात आलेल्या रेल्वे -
12114, 22937, 20925, 22137, 19003, 19004, 19007, 01140, 02132, 12105, 11128
पाच तारखेला रद्द करण्यात आलेल्या रेल्वे -
12136, 12113, 11026, 12140, 12139, 11120, 11119, 22938, 09077, 09078, 20926, 22138, 11114, 11113, 11039, 11040, 19005, 19006, 19008, 02131, 12112, 12106, 11127, 11128
सहा तारखेला रद्द करण्यात आलेल्या रेल्वे -
12135, 11025, 11120, 11119, 09077, 09078, 11114, 11113, 19003, 19004, 19005, 19006, 19008, 12111, 11127


या रेल्वेंच्या मार्गात बदल


Train No 22940 बिलासपूर –हापा एक्स्प्रेस   
Train No 12834 हावडा–अहमदाबाद एक्स्प्रेस   
Train No 19484 बरौनी– अहमदाबाद एक्स्पेस
Train No 16734 ओखा – रामेश्वरम एक्स्पेस  
Train No 12716 अमृतसर–नांदेड सिकंदराबाद एक्स्पेस
Train No 12656 चेन्नई सेंट्रल – अहमदाबाद
Train No 19046 छापरा-सूरत एक्स्पेस  
Train No 22948 भागलपूर  – सूरत एक्स्पेस
Train No 16501 अहमदाबाद–यशवंतपूर एक्स्पेस
Train No 20819 पुरी -ओखा द्वारका एक्स्पेस
Train No 17324 बनारस - हुबळी एक्स्पेस
Train No 22827 पुरी-सूरत एक्स्प्रेस
Train No 12994 पुरी- गांधीग्राम एक्स्पेस


जळगाव यार्ड रीमॉडेलिंगमुळे रद्द झालेल्या खालील गाड्या पूर्ववत करण्याबाबत
पूर्ववत करण्यात येणाऱ्या गाड्या
12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस JCO 5.12.2022
12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस JCO 6.12.2022
12105 मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस JCO 4.12.2022
12106 गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस JCO 5.12.2022


याशिवाय विशेष गाडी क्र. 01266 नागपूरहून पाच तारखेला 15.50 वाजता सुटेल आणि सहा तारखेला 10.55 वाजता सीएसएमटी, मुंबईला पोहोचेल ( वेळ बदलून सेवाग्राम गाडीच्या ठिकाणी) या विशेष गाडीचे थांबे : अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर). विशेष गाडी क्रमांक 01253 दादरहून सात तारखेला (6/7.12.2022 च्या मध्यरात्री) 0.40 वाजता निघेल आणि त्याच दिवशी 15.55 वाजता अजनीला पोहोचेल ( थांबे: कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड , जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम)