Sarkari Naukri Recruitment News: सरकारी नोकरी (Sarkari Naukri) करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (mazagon dock shipbuilders limited) विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये 8वी ते 10वी पास असलेले उमेदवार देखील भरतीसाठी अर्ज करू शकतात. 500 हून अधिक पात्र उमेदवारांची शिकाऊ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.


भरतीसाठी केवळ ऑनलाइन अर्ज करता येणार


माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने रिक्त जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. ज्या अंतर्गत पात्र उमेदवारांची 500 हून अधिक शिकाऊ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु इच्छितात ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. या भरतीसाठी केवळ ऑनलाइन अर्ज करता येईल. Mazagon Dock Shipbuilders Limited च्या या रिक्त पदांशी संबंधित महत्त्वाच्या तपशीलांची माहिती साईटवर मिळू शकते. 


अर्ज करण्यची अंतिम तारीख ही 2 जुलै 2024 


या भरती मोहिमेद्वारे, Mazagon Dock Shipbuilders Limited मध्ये एकूण 518 शिकाऊ पदांची भरती केली जाणार आहे. सध्या अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्यची अंतिम तारीख ही 2 जुलै 2024 आहे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी लकरात लवकर अर्ज भरावा.  


परीक्षेची तारीख 10 ऑगस्ट 2024 


दरम्यान, अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेची तारीख ही 10 ऑगस्ट 2024 निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र काही दिवस आधी 26 जुलै 2024 रोजी जारी केले जाणार आहेत. याची उमेदारांनी दखल घ्यावी.


अ ची 218 पदे, गट ब ची 240 पदे आणि गट क ची 60 पदे 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या भरती मोहिमेद्वारे एकूण 518 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये गट अ ची 218 पदे, गट ब ची 240 पदे आणि गट क ची 60 पदे आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव श्रेणी, PH उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.


कोण अर्ज करू शकतो?


Mazagon Dock Shipbuilders Limited च्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून 8वी किंवा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे उमेदवार किमान 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण झाले आहेत ते गट अ पदांसाठी अर्ज करू शकतात. 1 ऑक्टोबर 2024 पूर्वी आयटीआय उत्तीर्ण झालेले गट बी पदासाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे, गट क पदांसाठी, मान्यताप्राप्त बोर्डातून 8 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. 15 ते 19 वर्षे वयोगटातील उमेदवार तीन पदांसाठी अर्ज करू शकतात.


किती मिळणार पगार?


निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 5500 ते 8500 रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातील. याविषयी इतर तपशील जाणून घेण्यासाठी, तुम्ही Mazagon Dock Shipbuilders Limited च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. ( mazagondock.in) तुम्ही या वेबसाइटवरून देखील अर्ज करू शकता. निवडीसाठी, उमेदवारांना परीक्षांच्या अनेक फेऱ्यांमध्ये बसावे लागेल. सुरुवातीला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी जावे लागेल. 


महत्वाच्या बातम्या:


सरकारी नोकरीची मोठी संधी! असिस्टंट लोको पायलट रिक्त पदांच्या संख्येत तिपटीने वाढ, तयारीला लागा