CISF Head Constable Recruitment 2022 :  तुम्ही जर निमलष्करी नोकरी (Paramilitary Jobs) शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या नोकरीत तरुणांसाठी चांगला पगार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत हेड कॉन्स्टेबलसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते लवकरात लवकर अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाईटवर cisf.gov.in जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे.


CISF हेड कॉन्स्टेबल भर्ती 2022 या पदांवर 249 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 


CISF हेड कॉन्स्टेबल भरती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :


या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देण्यात आली आहे. 


सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल भरती 2022 :


हेड कॉन्स्टेबल (जीडी) या पदासाठी एकूण - 249 साठी रिक्त जागा तपशील


CISF हेड कॉन्स्टेबल भर्ती 2022 साठी पात्रता निकष :


कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/बोर्डातून 12वी उत्तीर्ण आहे. तसेच क्रीडा आणि ऍथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व केलेले असावे.


CISF हेड कॉन्स्टेबल भरती 2022 साठी वयोर्यादा :


वयोमर्यादा या पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्ष दरम्यान असावे.


CISF हेड कॉन्स्टेबल भरती 2022 साठी अर्ज फी :


उमेदवारांसाठी 100 रुपये आहे आणि महिला आणि SC/ST उमेदवारांसाठी अर्ज फी माफ केली आहे. 


CISF हेड कॉन्स्टेबल भर्ती 2022 साठी वेतन :


नोकरीच्या उमेदवारांसाठी वेतन मॅट्रिक्स स्तर-4 (रु. 25,500-81,100/-) आणि सामान्य भत्ते.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha