ONGC Recruitment 2022 : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडने नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 922 पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागा देहरादून (उत्तराखंड), दिल्ली, मुंबई (महाराष्ट्र), गोवा, गुजरात, जोधपूर (राजस्थान), चेन्नई, झारखंड आणि कराईकल (तामिळनाडू आणि पुद्दुचेरी), आसाम, आगरतळा (त्रिपुरा), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि बोकारो (पश्चिम बंगाल) येथे आहेत. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्जाची प्रक्रिया 7 मे 2022 पासून सुरू आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवार ONGC च्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रताकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांसाठी, उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असावा. तर, कनिष्ठ तंत्रज्ञ पदांसाठी उमेदवारांनी हायस्कूल आणि संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
वयइच्छुक अर्जदारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 15 मे 1998 ते 15 मे 2004 दरम्यान झालेला असावा. उच्च वयोमर्यादा ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे, SC/ST उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी दहा वर्षे शिथिल असेल.
निवड प्रक्रियाया पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणीद्वारे केली जाईल. याशिवाय पीएसटी, पीईटी, स्किल टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट घेतली जाईल.
पगारविविध स्तरांसाठी निवडलेल्या उमेदवारांना वेगवेगळे वेतन मिळेल. पगार उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या पातळीनुसार मिळेल.
F1 स्तर रु. 29,000 - रु. 98,000A1 स्तर रु. 26,600 - रु. 87,000W1 स्तर रु 24,000 - रु 57,500
महत्त्वाच्या इतर बातम्या
- MPSC Exam : मोठी बातमी! राज्य पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला होणार, 161 पदांसाठी भरती
- MPSC Recruitment 2022 : लोकसेवा आयोगामध्ये 10वी उत्तीर्णांसाठी जागा रिक्त, 12 मे पूर्वी अर्ज करा
- NEET PG 2022 : नीट पीजी परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच होणार जारी; डाऊनलोड कुठून कराल?
- IPPB Recruitment 2022 : बँकेत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मोठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या सविस्तर