NBCC Recruitment 2022 : NBCC म्हणजेच नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी), अतिरिक्त महाव्यवस्थापक (मार्केटिंग), प्रोजेक्ट व्यवस्थापक (सिव्हिल) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NBCC च्या अधिकृत वेबसाइट nbccindia.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 23 पदांची भरती करण्यात येणार आहे. 


महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जून 2022


शैक्षणिक पात्रता 
जनरल मॅनेजरच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली असावी. अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील एमबीए पदवी असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. 


रिक्त पदांचे तपशील जाणून घ्या रिक्त 
पदांची एकूण संख्या- 23
महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी)- 06 पदे
अतिरिक्त महाव्यवस्थापक (विपणन)- 02 पदे
प्रोजेक्टर महाव्यवस्थापक (सिव्हिल)- 15 पदे


वयोमर्यादा
या भरतीअंतर्गत महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 49 वर्षे, अतिरिक्त महाव्यवस्थापक (विपणन) या पदासाठी उमेदवारांचे वय 45 वर्षे असावे. प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल) पदासाठी उमेदवाराचे वय 37 वर्षे असावे. 


वेतन तपशील जाणून घ्या 
महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी) - पगार रु. 90,000 ते रु. 2,40,000 
अतिरिक्त महाव्यवस्थापक (मार्केटिंग) - पगार रु 80,000 ते रु. 2,20,000 
प्रोजेक्ट जनरल मॅनेजर (सिव्हिल) - पगार 60,000 ते 1,80,000 रु. पर्यंत


महत्त्वाच्या इतर बातम्या


Job Majha : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीच्या संधी, असा करा अर्ज


Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गेत विविध पदांची भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील


​Indian Bank SO Recruitment 2022 : 'या' बँकेत 300 हून अधिक पदांची भरती; कसा कराल अर्ज, जाणून घ्या


​​IIT Recruitment 2022 : आयआयटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या कसा कराल अर्ज?