Indian Institute of Technology Bombay Recruitment 2022 : आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने कनिष्ठ अभियंता, अभियंता आणि सहाय्यकांसह विविध पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी IIT बॉम्बेच्या अधिकृत साइट iitb.ac.in वर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या भरतीअंतर्गत एकूण 31 पदांवर भरती करणार आहे. ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाची 7 पदे, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक 22 पदे, कनिष्ठ अभियंता (बॅक लॉग) 01 पदे आणि अधीक्षक अभियंता 1 पदाचा समावेश आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यकाच्या 22 पदांपैकी 07 पदे अनुसूचित जातीसाठी, 04 पदे अनुसूचित जमातीसाठी, 02 पदे आर्थिक मागास प्रवर्गातील (EWS) उमेदवारांसाठी आणि 09 पदे अनारक्षित प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
शैक्षणिक पात्रता
IIT बॉम्बेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीअंतर्गत अधीक्षक अभियंता पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये B.Tech/BE 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे. तसेच कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यकासाठी इच्छुक उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
पगार किती?
अधीक्षक अभियंता पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर 13 अंतर्गत 1 लाख 23 हजार 100 ते 2 लाख 15 हजार 900 पर्यंत योग्यतेनुसार वेतन दिले जाईल. तसेच कनिष्ठ अभियंता पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर-6 अंतर्गत 35,400 ते 1,12,400 रुपये आणि कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक पदांसाठी वेतन स्तर 3 अंतर्गत 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत योग्यतेनुसार पगार मिळेल.
या भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार IIT बॉम्बेच्या iitb.ac.in या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Maharashtra : महाराष्ट्रात 2 लाख 44 हजार पदं रिक्त, 'या' विभागांमध्ये होणार मोठी भरती
- Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गेत विविध पदांची भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील
- Indian Bank SO Recruitment 2022 : 'या' बँकेत 300 हून अधिक पदांची भरती; कसा कराल अर्ज, जाणून घ्या