Maharashtra Metro Rail Corporation Limited Recruitment 2022 : महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या (Maharashtra Government Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र मेट्रोमध्ये भरती आहे. मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited) ने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेद्वारे (Maharashtra Metro Rail Corporation Limited Recruitment 2022), डेप्यूटी इंजीनियर, ज्युनियर सुपरव्हाइजर, कनिष्ठ अभियंता, असिस्टंट जनरल मॅनेजेर यांसह अनेक पदं भरली जातील. 


ऑनलाईन अर्ज करा 


महाराष्ट्र मेट्रोल रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला महा मेट्रोच्या अधिकृत वेबसाइट, mmrcl.com वर जावं लागेल. इतर कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2022 आहे.


शैक्षणिक पात्रता 


महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (Maharashtra Metro Rail Corporation Limited) या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलते. सर्वसाधारणपणे, संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच पदानुसार, काही वर्षांचा अनुभव असणंही गरजेचं आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. 


33 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.


वेतन


एमएमआरसीच्या या पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना चांगला पगार मिळू शकतो. उमेदवारांचे वेतन महिन्याला 60 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत असू शकते. तपशीलवार जाणून घेण्यासाठी, आपण अधिकृत वेबसाइटवर दिलेली अधिसूचना तपासू शकता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :