Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
मध्य रेल्वे मुंबई, राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा, SAMEER, मुंबई आणि IBM, नागपूर या ठिकाणी नोकरीची संधी आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे,
मध्य रेल्वे मुंबई
पोस्ट – कनिष्ठ तांत्रिक सहयोगी (ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट)
एकूण जागा – 20
शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग / B.Sc.
नोकरीचं ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता: उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) यांचं कार्यालय (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, सहावा मजला, अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी.एन.रोड, मध्य रेल्वे, मुंबई CSTM, महाराष्ट्र – 400001
अधिकृत वेबसाईट - www.rrccr.com
राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा
पोस्ट - कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजी/यूरोलॉजी, ऑन्कोलॉजिस्ट
एकूण जागा – 03
शैक्षणिक पात्रता – कार्डिओलॉजिस्ट पदासाठी DM कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी/यूरोलॉजी पदासाठी DM नेफ्रोलॉजी आणि ऑन्कोलॉजिस्ट पदासाठी MS सर्जरी ही पात्रता हवी.
मुलाखतीतून ही निवड होणार आहे.
नोकरीचं ठिकाण आहे. – भंडारा
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा
मुलाखतीची तारीख – 1 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट - bhandarazp.org.in
SAMEER, मुंबई (सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई )
पोस्ट - ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
एकूण जागा – 30
शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी पास, ITI
नोकरीचं ठिकाण – मुंबई
ईमेलद्वारे तुम्हाला अर्ज पाठवयाचा आहे.
मुलाखतीच्या माध्यमातून निवड होणार आहे.
मुलाखतीची तारीख – 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2022
मुलाखतीचा पत्ता - समीर, IIT कॅम्पस, हिल साईड, पवई, मुंबई- 400076
अधिकृत वेबसाईट - www.sameer.gov.in ( या वेबसाईटवर गेल्यावर[RK1] important मध्ये recruitment वर क्लिक करा. त्यात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची माहिती मिळेल. Vacancy details वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
IBM, नागपूर (Indian Bureau of Mines Nagpur)
पोस्ट - प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक, कायदा अधिकारी, निम्न विभाग लिपिक
एकूण जागा – 18
नोकरीचं ठिकाण – नागपूर
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 10, 20, 21मार्च 2022(पदानुसार ही अंतिम तारीख आहे. )
अर्ज पाठवण्याचा पत्ता- खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर- 440001
ई- मेल आयडी आहे - ho-office@ibm.gov.in (प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक, कायदा अधिकारी या पोस्टसाठी अप्लाय करताना हा मेल आयडी आहे.)
अधिकृत वेबसाईट- ibm.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या whats new मध्ये recruitment in IBM वर क्लिक करा. त्यात तुम्हाला प्रत्येक पोस्टविषयीची जाहिरात दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI