Job Majha : स्टेट बँक ऑफ इंडिया, मध्य रेल्वे भुसावळ विभाग जळगाव आणि मृद व जलसंधारण विभाग पदांवर भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईल अर्ज करायचा आहे. तर मध्य रेल्वेतील भरतीसाठी थेट मुलाखत आहे. 4 ऑक्टोबर 2022 रोजी आवश्यक कागदपत्रांसह DMRS कार्यालय, भुसावळ भुसावळ, मध्य रेल्वे, भुसावळ येथे उपस्थित राहायचं आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती जाणून घ्यावी आणि या भरतीसाठी अर्ज करावा.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
पोस्ट - प्रोबेशनरी ऑफीसर (PO)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर
एकूण जागा - 1 हजार 673
वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
तपशील - sbi.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर home मध्ये careers वर क्लिक करा. Join SBI मध्ये current openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मध्य रेल्वे भुसावळ विभाग, जळगाव
पोस्ट - पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शाळा शिक्षक
शैक्षणिक पात्रता - M.Sc पदव्युत्तर पदवी, पदवीधर, B.Ed
एकूण जागा - 22
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता - DMRS कार्यालय, भुसावळ भुसावळ, मध्य रेल्वे, भुसावळ
मुलाखतीची तारीख - 4 ऑक्टोबर 2022
तपशील - cr.indianrailways.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर news & recruitment मध्ये contract appointment bhusawal division यावर क्लिक करा. ENGAGEMENT OF CONTRACT TEACHERS ON FULL-TIME BASIS यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मृद व जलसंधारण विभाग
पोस्ट - गट-ब जलसंधारण अधिकारी
शैक्षणिक पात्रता - जलसंपदा/ जलसंधारण/ पाणी पुरवठा/ सार्वजनिक बांधकाम विभागातील गट ब जलसंधारण अधिकारी, सेवानिवृत्त जलसंधारण अधिकारी/ अभियंता
एकूण जागा - 60
नोकरीचं ठिकाण - वाशीम
अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, वाशीम जुनी नगर परिषद इमारत, अग्रसेन चौक, वाशीम – ४४४ ५०५
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - waterconserve.maharashtra.gov.in