Chandrakant Patil On Aaditya Thackeray : शक्ती वापरण्यासाठी नव्हे तर भीती दाखवण्यासाठी निर्माण करायची असते. जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतायत, असे टीकास्त्र भाजप नेते आणि राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. चंद्रकांत पाटील आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवेसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षावर टीकेचा बाण सोडला.
महाराष्ट्रात येणारा महत्वपूर्ण फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता आदित्य ठाकरे हे राज्यभर जनआक्रोश मोर्चा काढणार आहेत. यावरून देखील चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे जसजसे जनआक्रोश यात्रेच्या निमित्ताने बाहेर पडतील तसं वेदांत प्रकल्प कोणामुळे महाराष्ट्रच्या बाहेर गेला हे सर्वांना समजेल. शक्ती वापरण्यासाठी निर्माण करायची नसते, शक्ती भीती दाखवण्यासाठी निर्माण करायची असते. जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलीय.
दरम्यान, शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला आज हाय कोर्टाने परवानगी दिली आहे. हाय कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी हाय कोर्टाच्या निर्णयावर बोलण्याचं टाळलं. चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाच्या निर्णयावर कधीही टिप्पणी करणे मला योग्य वाटत नाही असे म्हणत यावर बोलण्याचे टाळले.
"पुण्यात लाठी-काठी शिकणाऱ्या हजारो मुली तयार होत आहेत, त्या शिकल्यानंतर मुलांची मुलींकडे पाहण्याची हिंमत होणार नाही. तरुणींना आत्मसंरक्षणासाठी लाठ्या काठ्यांचे प्रशिक्षण देणार असून पुण्यात सध्या पाच हजार तरुणींना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. मुलींच्या खिशात बसेल अशी काठी देणार आहोत, जेणेकरून कोणत्या तरुणाने छेड काढली तर खिशातून ती काठी काढून त्याच्या डोक्यात मारायची. एकदा का कळले की तरूणी काठ्याने मारतात तर कोणाची हिंम्मत होणार नाही परत छेड काढण्याची असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
दसरा मेळाव्याला वाजत-गाजत, गुलाल उधळत या, पहिल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena Dasara Melava Verdict: ठाकरेंचा पहिला मोठा विजय, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी