Job Majha :  नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), ठाणे महानगरपालिका, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मधील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर इतर तीन ठिकाणच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
 


इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)


पोस्ट : अभियंता


शैक्षणिक पात्रता : B.E./ B. Tech


एकूण जागा : 513


वयोमर्यादा : 18 ते 26 वर्ष


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023


अधिकृत वेबसाईट - iocl.com


ठाणे महानगरपालिका ( Thane Municipal Corporation )


पोस्ट : योगा शिक्षक


शैक्षणिक पात्रता : योगप्रशिक्षणाची पदवी


एकूण जागा : 27


नोकरीचं ठिकाण : ठाणे


अर्ज पाठवण्याचा पत्ता  : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे- 400602


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2023


डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे ( Dr. D. Y. Patil University pune  )


पोस्ट : प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक


एकूण जागा : 13


नोकरीचं ठिकाण - पुणे


अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी- career@dpu.edu.in


अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव, डी.वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे- 411018


अर्ज करण्याची शेवटची तारीख  :  1 मार्च 2023


अधिकृत वेबसाईट - dpu.edu.in


गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ( Gondwana University Gadchiroli  )


पोस्ट : मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक-उष्मायन सेवा, कार्यकारी-विपणन आणि फॉरवर्ड लिंकेज, कार्यालय प्रशासक.


शैक्षणिक पात्रता : पदवीधर


एकूण जागा : 04


नोकरीचं ठिकाण : गडचिरोली


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, नवोपक्रम, उष्मायन आणि लिंकेज, नवीन परीक्षा भवन, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली- 442605


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट : unigug.org


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Job Majha : आयडीबीआय बँक आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध पदांसाठी भरती