Vastu Tips : वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेवर आधारित आहे. असे म्हटले जाते की, वास्तूनुसार घर बांधल्यास घर कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम खूप प्रभावी मानले जातात. सकारात्मक ऊर्जा घरात सुख-समृद्धी आणते तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्या घेऊन येते. अनेक वेळा सर्व काही योग्य पद्धतीने करूनही माणसाला पुन्हा पुन्हा अपयशाला सामोरे जावे लागते. वास्तूनुसार, व्यक्तीच्या काही सवयी त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात, ज्यामुळे घरात नेहमीच आर्थिक संकट असते. चला जाणून घेऊया वास्तूनुसार, व्यक्तीने कोणत्या सवयींपासून दूर राहावे. 


Vastu Tips : या सवयी प्रगतीच्या आड येतात


अनेकजण पलंगावर बसून जेवण करतात. वास्तुशास्त्रानुसार, पलंगावर बसून जेवण केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. यासोबतच घरातील सुख-शांती भंग पावते. अंथरुणावर बसून जेवल्याने कुटुंबातील सदस्यांवरही कर्ज वाढते.


रात्रीचे जेवण झाल्यावर बरेच लोक किचन अस्वच्छ आणि सिंकमध्ये पडलेली भांडी टाकून झोपी जातात. वास्तुशास्त्रानुसार रात्री खरखटी भांडी सोडल्याने माता अन्नपूर्णा कोपते. या सवयीमुळे आर्थिक विवंचनेसोबत मानसिक तणावाचाही सामना करावा लागतो.


वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर डस्टबिन कधीही ठेवू नये. असे मानले जाते की मुख्य दरवाजातून देवी-देवता घरामध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. अशा वेळी मुख्य गेटवर डस्टबीन ठेवल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. त्यामुळे डस्बीन मुख्य दारावर न ठेवता घरात ठेवावी. 


असे म्हटले जाते की दान केल्याने दक्षिणा पुण्य मिळते. पण वास्तुशास्त्रानुसार कोणीही सूर्यास्तानंतर दूध, दही, कांदा, मीठ या गोष्टींचे दान करू नये. असे मानले जाते की संध्याकाळी या वस्तूंचे दान केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते आणि घरामध्ये दारिद्र्य येते. 


असे म्हटले जाते की, जेवण झाल्यानंतर त्याच जागेवर बसून आळस देऊ नये. जेवलेल्या जागेवर बसून आळस दिल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो. त्यामुळे घरात पैसा राहत नाही. त्यामुळे घरातील सदस्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जेवल्यानंतर त्याच जागेवर आळस देण्याचे टाळा.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Samudra shastra Rajyog : तुमच्या तळहातावर राजयोगाची रेषा आहे? तर असे लोक होतील खूप श्रीमंत