Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय खाद्य निगम (FCI) याठिकाणी मेगाभरती निघाली आहे. विविध पदांच्या पाच हजार 43 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 5 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मुंबई महापालिकेत देखील विविध पदांसाठी भरती निघाली आहे.
भारतीय खाद्य निगम (FCI)
पोस्ट : AG-III (यात तांत्रिक, सामान्य, खाते, डेपो यांचा समावेश आहे.) तसंच जेई (सिव्हिल), हिंदी टायपिस्ट AG-II, स्टेनो ग्रेड II या पोस्ट आहेत.
शैक्षणिक पात्रता : AG-III (तांत्रिक) या पदासाठी कृषी/वनस्पतीशास्त्र/जीवशास्त्र/बायोटेक/फूड यामध्ये पदवीधर, AG-III (सामान्य) या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी तसंच संगणकाचं ज्ञानही आवश्यक आहे.
AG-III (खाते) या पदासाठी B.Com पदवी आणि संगणकाचे ज्ञान असावे. AG-III (डेपो) या पदासाठी संगणकाचे ज्ञान असलेले पदवीधर असावेत. JE (EME) या पदासाठी 1 वर्षाच्या अनुभवासह EE/ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा, जेई (सिव्हिल) पदासाठी 1 वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा, हिंदी टायपिस्ट AG-II पदासाठी पदवीधर आणि हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असावा. तसंच भाषांतराचा एक वर्षाचा अनुभवही असावा. स्टेनो ग्रेड-II – पदवीधर, टायपिंग आणि स्टेनोचे कामही यायला हवं.
एकूण जागा : 5 हजार 43
वयोमर्यादा : 21 ते 28 वर्ष (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑक्टोबर 2022
तपशील : fci.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर current recruitment वर क्लिक करा. ३ सप्टेंबरच्या जाहिरातीवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
विविध पदांच्या 714 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर, सेंट्रल ऑपरेशन टीम, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, रिजनल हेड, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर आणि सिस्टम ऑफिसर
शैक्षणिक पात्रता - B. Tech or B.E./M. Tech, पदवीधर, MBA (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २० सप्टेंबर २०२२
तपशील - www.sbi.co.in
मुंबई महानगरपालिका
पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक (ऍनेस्थेशिया)
शैक्षणिक पात्रता : MD/MS/DNB, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 25
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण - मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता - एल.टी.एम.एस. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई - ४०० ००२
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - १२ सप्टेंबर २०२२
तपशील - portal.mcgm.gov.in