Job Majha : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिऐशन, मालेगाव महानगरपालिका आणि महापारेषणमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. मालेगाव महानगरपालिकेतील पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. तर पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिऐशन आणि महापारेषणमधील विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊया.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिऐशन ( Pune District Urban Cooperative Bank Association)
पोस्ट : ट्रेनी लिपिक (फक्त महिला)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, संगणक ज्ञान
एकूण जागा : 50
वयोमर्यादा : 22 ते 33 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.punebankasso.com
मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation )
पोस्ट : फायरमन
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण.
एकूण जागा : 50
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण : मालेगाव
मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मालेगाव.
मुलाखतीची तारीख : 22 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.malegaoncorporation.org
महापारेषण ( Mahapareshan )
पोस्ट : इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, NCTVT
एकूण जागा : 87
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण : मुंबई, पालघर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचे 2 पत्ते आहेत.
नवी मुंबईचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई- 400 708.
पालघरचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैराफाटा, मुक्काम विद्यानगर, पोस्ट सरावली. तालुका पालघर, जिल्हा- पालघर- ४०१ ५०१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्वाच्या बातम्या