Job Majha : बँक ऑफ महाराष्ट्रनं बंपर भरती जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेतंर्गत 314 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच मुंबई पोर्ट ट्रस्टमध्येही भरती जाहीर करण्यात आली असून विविध पदांच्या 61 जागांसाठी भरती निघाली आहे. ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करायचे आहेत. 

बँक ऑफ महाराष्ट्र

पोस्ट : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 314

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2022

तपशील : www.bankofmaharashtra.in

मुंबई पोर्ट ट्रस्ट

विविध पदांच्या 61 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट : कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ITI

एकूण जागा : 50

पोस्ट : पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)

एकूण जागा : 02

पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)

एकूण जागा : 03

पोस्ट : टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा : 03

पोस्ट : टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा : 03

नोकरीचं ठिकाण : मुंबई

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : ATC, भंडार भवन, तिसरा मजला, एन.व्ही. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई : 400010

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ www.mumbaiport.gov.in

(वर देण्यात आलेल्या वेबसाईटवर गेल्यावर media मध्ये vacancy वर क्लिक करा. advertisement वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्तारानं माहिती मिळेल.)

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Job Majha : पुणे महानगरपालिका आणि महानदी कोलफील्ड्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती