Delhi Capitals Auction Strategy 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 16 व्या हंगामासाठी (IPL 2023) 23 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. सर्व आयपीएल संघांमध्ये मिळून एकूण 87 खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत, ज्यासाठी 405 खेळाडू लिलावात सामिल होणार आहेत. आयपीएलच्या सर्व 10 संघांना या 87 स्लॉटसाठी एकूण 206.5 कोटी रुपये उपलब्ध असतील. यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा विचार करता 5 स्लॉट रिक्त आहेत आणि त्यांच्या पर्समध्ये एकूण 19.45 कोटी रुपये शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2023 च्या मिनि ऑक्शनपूर्वी शार्दुल ठाकुरला केकेआरला ट्रेड केलं होतं. ज्यातून त्यांच्याकडे पैसे आले असून सध्या एकूण 19.45 कोटी रुपये आहेत.


दिल्ली संघात सध्या 26 खेळाडू आहेत. यामध्ये 20 भारतीय आणि 6 विदेशी खेळाडू आहेत. या 26 खेळाडूंची किंमत 75.55 कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान आयपीएलमध्ये एका संघात जास्तीत जास्त 31 खेळाडू असू शकतात. अशा परिस्थितीत दिल्लीला या लिलावात 5 खेळाडू निवडण्याचा पर्याय असेल, त्यापैकी दोन खेळाडू परदेशी असू शकतात. तर नेमका आता दिल्लीचा संघ कसा आहे आणि त्यांनी कोणाला रिलीज केलं ते पाहूया...


आगामी मिनी ऑक्शनपूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा संघ- एनरिच नोर्खिया, अक्षर पटेल, चेतन साकारिया, डेव्हिड वॉर्नर, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ललित यादव, लुंगी एनगिडी, मिचेल मार्श, मुस्तफिझूर रहमान, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, ऋषभ पंत, रोवमन पॉवेल, सर्फराज खान, सर्फराज खान. अहमद, विकी ओस्तवाल, यश धुल्ल, अमन खान (ट्रान्सफर होऊन संघात सामिल)


आयपीएल 2023 पूर्वी या खेळाडूंना केलं रिलीज- अश्विन हीब्बार, केएस भरत, मंदीप सिंह, टिम सिफर्ट.


प्लेऑफमध्येही पोहोचू शकली नव्हती दिल्ली कॅपिटल्स


स्टार खेळाडू ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. मागील वेळी दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यास थोडक्यात मुकला होता. दिल्लीने 14 पैकी 7 सामने जिंकले होते आणि तर एकूण 7 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे डीसी पाचव्या स्थानावर होती. ज्यानंतर यंदा संघ कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.


हे देखील वाचा-