Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.  फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने आयोजित केलेल्या एका पार्टीत नुकतीच करीना दिसली होती. त्यानंतर ती शनिवारी दुपारी तैमूर अली खानसोबत बहीण करिश्माच्या घरी जाताना स्पॉट झाली आहे. 


करीना आणि तैमूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करीना आणि तैमूर घराबाहेर पडताना दिसत आहे. तैमूरची काळजी घेणारी नॅनीदेखील तैमूरची बॅग काडीत ठेवायला जात असताना ती तैमूरच्या पाठीवर हात ठेवते. त्यावेळी तैमूर तिला म्हणतो,"मला स्पर्श करू नकोस".





तैमूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत त्यांचा राग व्यक्त करत आहेत. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर-खानचा दुसरा मुलगा जेह अली खान नुकताच एक वर्षाचा झाला आहे.


संबंधित बातम्या


House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड


Shruti Haasan Tests Positive : अभिनेत्री श्रुती हासनला कोरोनाची लागण


Mann Ki Baat: टांझानियन भाऊ-बहिणीने पंतप्रधान मोदी यांना केलं इम्प्रेस, मन की बातमध्ये केलं कौतुक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha