Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.
पोस्ट - व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता - B.E/ B. Tech / Computer Engineering /IT किंवा MCA/ MSC Computer Science/ IT
- एकूण जागा - सात
- वयोमर्यादा - व्यवस्थापक पदासाठी 45 वर्ष, सहव्यवस्थापक पदासाठी 40 वर्ष, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 30 वर्ष
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई- 400001
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2022
- तपशील - www.mscbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. RECRUITMENT OF INFORMATION TECHNOLOGY SPECIALIZED OFFICERS या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
सिटीझन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक
पोस्ट - प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी असोसिएट्स
- शैक्षणिक पात्रता - प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा CA, CS, ICWA, CFA, MBA, LLM, M.Tech ही पात्रता हवी आणि प्रोबेशनरी असोसिएट्स पदासाठी पदवीधर ही पात्रता हवी. या दोन पदांसाठी बँकेने अद्याप रिक्त पदांची संख्या जाहीर केलेली नाही. बँकेनुसार ही भरती मुंबई, पुणे, नाशिक, गोवा इथल्या शाखांमध्ये करायची आहे.
- वयोमर्यादा - प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 20 ते 30 वर्ष, प्रोबेशनरी असोसिएट्स पदासाठी 20 ते 26 वर्ष
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 2 ऑगस्ट 2022
- तपशील - citizencreditbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर About मध्ये careers वर क्लिक करा. Recruitment for the Post of Probationary Officers and Probationary Associates. या लिंकमध्ये Click here for details.यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
भाभा अणू संशोधन केंद्र
पोस्ट - लघुलेखक, चालक, कार्य सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता - दहावी पास
- एकूण जागा - 89
- वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष
- नोकरीचं ठिकाण - मुंबई
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख - 31 जुलै 2022
- तपशील - www.barc.gov.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
पोस्ट - शहर कार्यक्रम व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता - MBBS/ BDS
- एकूण जागा - 111
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 जुलै 2022
- तपशील - arogya.maharashtra.gov.in