Aurangabad News: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची (Aditya Thakaray)  शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) आज तिसऱ्या दिवशी औरंगाबादमध्ये पोहचली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तर याचवेळी राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार असल्याचं आदित्य ठाकरे पहिल्यांदाच म्हणाले आहे. सोबतच राज्यातील गद्दारांच सरकार कोसळणारचं असेही आदित्य म्हणाले. 


काय म्हणाले आदित्य ठाकरे...


पैठणच्या बिडकीन येथे झालेल्या सभेत बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, जे ईमान विकून जात असतो तो कधीच शिवसैनिक नसतो. पण आपल्याला पुन्हा एकदा ताकद दाखवायची आहे. लढायचं आहे आणि जीकायाचं आहे. मी तुम्हाला आजच सांगत आहे की, मध्यवर्ती निवडणुका होणार म्हणजे होणार आणि हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असे आदित्य ठाकरे म्हणाले. हे स्वर्थी लोकांचं सरकार आहे,हे गद्दारांच सरकार आहे, हे बेकायदेशीर सरकार आहे.त्यामुळे मध्यवर्ती निवडणूक होणार असून, तुमची ताकद मतपेटीतून दाखवून द्या. त्यामुळे तुमचे आशीर्वाद मला द्या असे आदित्य ठाकरे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या...


Which is the real Shiv Sena? : कुठली शिवसेना खरी हे ठरवताना निवडणूक आयोग नेमकं काय पाहणार?


मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात; दोन टप्प्यात विस्तार; पहिल्या टप्प्यात या 12 जणांना संधी?