PV Sindhu beats He Bing Jiao: भारताची बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधुनं बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्यपूर्व फेरीत पीव्ही सिंधुनं चीनच्या हि बिंग जियाओला पराभूत केलं. हि बिंग जियाओ विरुद्ध पीव्ही सिंधुनं  21-9, 13-21, 21-19 असा विजय मिळवला आहे. 



दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं शानदार सुरुवात केली. सिंधू पहिल्या सेटमध्ये बिंग जियाओवर पूर्णपणे भारी पडली. अखेर 21-9 च्या फरकानं पीव्ही सिंधुनं पहिला सेट जिंकला. सिंधुच्या आक्रमक खेळीसमोर बिंग जियाओनं गुघडे टेकले. परंतु, तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. दरम्यान, बिंग जियाओनं 21-13 फरकानं दुसरा सेट जिंकत  शानदार पुनरागमन केलं.


तिसऱ्या आणि अखेरच्या सेटमध्ये पीवी सिंधुनं बिंगजियाओला एकही संधी दिली नाही. 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर सिंधूनं 6-2 अशी आघाडी घेतली. पण बिंग जियाओ पुनारागमन करत पीव्ही सिंधुला जोरदार टक्कर दिली.  अखेरीस, सिंधुनं तिसरा सेट 21-19 फरकानं जिंकून उपांत्य फेरीत धडक दिली आहे. सिंधूनं महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये सिंगापूरच्या यू यान जसलीन हुईचा पराभव केला.


पीव्ही सिंधुवर कौतुकाचा वर्षाव
पीव्ही सिंधुच्या या कामगिरीमुळं तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच या स्पर्धेतील उपांत्य फेरीत पीव्ही सिंधु कशी कामगिरी करते? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 


हे देखील वाचा-