Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रो (ISRO) आणि नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. 


नवी मुंबई महानगरपालिका


वैद्यकीय अधिकारी – 55


शैक्षणीक पात्रता : एम.बी.बी.एस. 


एकूण जागा- 55


वयोमर्यादा : 38 ते 70 वर्षापर्यंत


नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)


मुलाखत दिनांक : 01 फेब्रुवारी 2024


अधिकृत संकेतस्थळ : nmmc.gov.in
---
स्टाफ नर्स (स्त्री) (पुरुष)


शैक्षणीक पात्रता : 12 वी उत्तीर्ण आणि जीएनएम कोर्स 


एकूण जागा- अनुक्रमे 49 आणि 06


वयोमर्यादा : 38 ते 70 वर्षापर्यंत


नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)


निवड पद्धत : मुलाखतीद्वारे


मुलाखत दिनांक : 01 फेब्रुवारी 2024


मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614.


अधिकृत संकेतस्थळ : nmmc.gov.in
------------


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)


तांत्रिक सहाय्यक 


शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी


एकूण जागा - 55


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024


अधिकृत वेबसाईट : isro.gov.in/
------
वैज्ञानिक सहाय्यक


शैक्षणिक पात्रता : B.Sc 


एकूण जागा - 26


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024


अधिकृत वेबसाईट : isro.gov.in/
-----
तंत्रज्ञ-B


शैक्षणिक पात्रता : SSC आणि ITI


एकूण जागा - 142


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024


अधिकृत वेबसाईट : isro.gov.in/


-----
कुक


शैक्षणिक पात्रता : 10वी पास, हॉटेल/कॅन्टीनचा अनुभव


एकूण जागा - 04


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024


अधिकृत वेबसाईट : isro.gov.in/
--------------
ही बातमी वाचा : 


BEL Recruitment 2024 : कामाची बातमी! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती, डिप्लोमा पास लगेचच करा अर्ज