ISRO Recruitment : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करण्याची संधी आहे. इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र असलेले उमेदवार 4 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
या पदांसाठी होणार भरती
इस्रोच्या संशोधन संस्थेत ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 297 पदांची भरती करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकची 40 पदे, फिटरसाठी 47 पदे, टर्नरची 20 पदे, मेकॅनिकसाठी18 पदे, मशिनिस्टची 20 पदे, इलेक्ट्रिशियनची 10 पदे, लॅब असिस्टंटची 20 पदे, डिझेल मेकॅनिककरीता 10 आणि प्लंबरसाठी 11 पदे आहेत.
विद्यावेतन किती?
ट्रेड अप्रेटिंससाठी निवड झालेल्या उमेदवारांना 7700 रुपयांपासून ते 9000 रुपये महिन्यापर्यंतचे विद्यावेतन (स्टायपेंड) मिळणार आहे.
पात्रता निकष
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रे़ड नॅशनल काउंसिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगची मान्यता असलेले आयटीआयचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे. शासकीय नियमांनुसार आरक्षित वर्गासाठी उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत असेल.
निवड कशी होणार?
इच्छुक उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे.
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, भरती आणि समीक्षा विभाग, व्हीएसएससी, तिरुवनंतपुरम-695022 मध्ये या ठिकाणी अर्ज पाठवावा. अधिक माहिती www.isro.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Forest Department Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी वन विभागात नोकरीची संधी, आज बंपर भरतीची शेवटची तारीख, लवकर करा अर्ज
- ONGC मध्ये नोकरी करायचीये? आजच अर्ज करा, प्रतिमाह 66 हजार रुपये मिळवण्याची संधी
- Delhi University Recruitment 2022: दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नोकरभरती, अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस