Scholarship Examination in Maharashtra : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेला मुहूर्त कधी लागणार ? याची प्रतीक्षा राज्यातील हजारो विद्यार्थी करत होते. मात्र आता ही परीक्षा जून महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षांचे अर्ज अजूनही भरले नाही. त्यांना सुद्धा अर्ज भरण्यासाठी अखेरची संधी देण्यात येणार आहे. 


दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. या वर्षी सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. या दृष्टीने परीक्षा परिषदेचे डिसेंबर महिन्याचा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने, अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आणि त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. 
त्यानंतर एकीकडे दहावी बारावी बोर्ड परीक्षा आणि दुसरीकडे टीईटी परीक्षेतील गैरप्रकार, यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या कंपनीला द्यावी ? असा प्रश्न परिषदेसमोर होता.


शासनाने विनर कंपनीच्या सहकार्याने परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना दिली असल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसात परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा बाबतची सुधारीत माहिती प्रसिद्ध करून परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे संभ्रमात असलेला विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना शिष्यवृत्ती परीक्षा नेमकी कधी होणार या प्रश्नाचं उत्तर मिळाला आहे. राज्यभरातून इयत्ता पाचवीचे 4,10,395 आठवीचे 2,99, 255 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 


राज्यातील शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून  शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू (School Reopen) झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक देखील मागणी करत होते. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहणार आहेत.  विद्यार्थ्यांच शालेय नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे यंदा मात्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त अभ्यासच करावा लागणार आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI