Gold Rate Today : जागतिक बाजारातील दबावामुळे मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. .चांदीचा भाव पुन्हा एकदा ६८ हजारांच्या खाली आला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी सकाळी घसरण सुरू केली. MCX वर 24 कॅरेट सोन्याचे दर 198 रुपयांनी घसरून 51,373 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 


एमसीएक्सवर चांदीही घसरली :


चांदीच्या फ्युचर्सच्या किमतीही सुरुवातीच्या व्यवहारापासून घसरल्या. मॉर्निंग एक्स्चेंजवर, चांदीचा दर 614 रुपयांनी घसरून 67,906 रुपये प्रति किलो झाला आहे. काल 1 किलो चांदीचा दर 68,520 रूपये होता. 


जागतिक बाजारात घसरलेले दर :


जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.15 टक्क्यांनी घसरून $1,925.60 प्रति औंस झाली. त्याच वेळी, चांदीचा स्पॉट रेट 0.46 टक्क्यांनी घसरून $25.08 प्रति औंस झाला. जागतिक बाजारातील घसरणीमुळे आज भारतीय बाजारात सोने-चांदीचे दर स्वस्त झाले आहेत.


तुमच्या शहराचे दर तपासा :


तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha