ONGS Vacancy 2022 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत ONGC सहयोगी सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार या पदांसाठी भरती करेल. अधिसूचनेनुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2022 निश्चित करण्यात आली आहे.
रिक्त जागांचा तपशील
या भरतीद्वारे प्रोडक्शन आणि इलेक्ट्रिकल डिसिप्लिनमध्ये एकूण 36 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ सल्लागाराच्या 14 आणि सहयोगी सल्लागाराच्या 22 पदांचा समावेश आहे.
वेतन
असोसिएट कन्सल्टंटच्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 66 हजार रुपये वेतन दिलं जाईल. तर, कनिष्ठ सल्लागार पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 40 हजार रुपये वेतन दिलं जाईल.
आवश्यक वयोमर्यादा
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
कशी होईल निवड?
अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना ही परीक्षा कुठे आणि केव्हा आयोजित केली जाईल, याविषयी माहिती दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिसूचना तपासू शकतात.
असा करा अर्ज
या भरतीसाठी उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात आणि इतर आवश्यक कागदपत्रे ईमेल आयडी - bhargavavikas@ongc.co.in वर 30 मार्च 2022 किंवा त्यापूर्वी पाठवावीत. उमेदवार कोणत्याही माहितीसाठी 9428330335 या क्रमांकावर संपर्क करू शकतात. तसेच, भरती संबंधित इतर माहितीसाठी तुम्ही ongcindia.com या अधिकृत साइटची मदत घेऊ शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Delhi University Recruitment 2022: दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नोकरभरती, अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस
- India Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागाकडून 'या' पदांसाठी भरती जाहीर; आठवी पास उमेदवारही करु शकतात अर्ज
- IOCL Recruitment 2022 : एक लाखभर रुपये प्रतिमाह मिळवण्याची नामी संधी, सरकारी नोकरीची संधी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha