Shri Guru Gobind Singh College of Commerce Delhi Recruitment 2022: दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी  (DU Assistant Professor Recruitment 2022) भरती सुरू करण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या श्री गुरु गोविंद सिंह कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी मागील काही दिवसांपासून अर्ज मागवण्यात आले आहेत. आता, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्वरीत अर्ज दाखल करावेत.


या तारखे आधी दाखल करावेत अर्ज  श्री गुरु गोविंद सिंह कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख एक एप्रिल 2022 आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये याबाबतची जाहिरात 23 मार्च रोजी प्रकाशित झाली होती. 


ऑनलाइन अर्ज करता येणार 


श्री गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सहाय्यक प्राध्यमापक पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. यासाठी तुम्हाला दिल्ली विद्यापीठाच्या colrec.du.ac.in या वेबसाइटवर जावे लागेल. 


याशिवाय, पात्रता, वेतन, वयोमर्यादा इत्यादीसारख्या या पदांबद्दल कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी, तुम्हाला महाविद्यालयाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ही माहिती तुम्हाला sggscc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 


किती जागा रिक्त?


श्री गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पुढील विषयांसाठीच्या सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.


वाणिज्य: 13


अर्थशास्त्र: 6


संगणक विज्ञान: 5


पंजाबी: 3


व्यवस्थापन अभ्यास: 3


राज्यशास्त्र: 1


पर्यावरण अभ्यास: 1


इंग्रजी:१


हिंदी : 1



अर्ज शुल्क -


या पदांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क जमा करायचे आहे. ओबीसी, आर्थिकदृष्ट्या मागास, महिला, अनुसूचित जाती-जमाती यांना कोणतेही परीक्षा शुल्क द्यावे लागणार नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI