Indian Oil Corporation LTD Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हीही अर्ज करु शकता. 


इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट iocl.com वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 मार्च 2022 आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (उत्पादन) या पदांसाठी ही भरती जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 4 पदं भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला कंपनीच्या वतीनं देण्यात आला आहे. 


भरती प्रक्रियेतील महत्वाच्या तारखा :



  • ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख : 08 मार्च 2022

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मार्च 2022


वयोमर्यादा


अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं किमान वय 19 वर्ष आणि कमाल वय 26 वर्ष आहे.


वेतन 


निवड झालेल्या उमेदवारांना प्रति माह 25,000 रुपये ते 1,05,000 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाऊ शकतं. 


निवड प्रक्रिया 


भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य/प्राविण्य/शारीरिक चाचण्यांच्या आधारावर केलं जाईल.


शैक्षणिक पात्रता 


उमेदवारांनी केमिकल/रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून किमान 50% गुणांसह B.Sc (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र) पदवी असणं आवश्यक आहे. पेट्रोलियम रिफायनरी/पेट्रोकेमिकल्स/फर्टिलायझर/हेवी केमिकल/गॅस प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये पंप हाऊस, फायर हीटर, कंप्रेसर, डिस्टिलेशन कॉलम, रिअॅक्टर, हीट एक्सचेंजर इ.च्या ऑपरेशनमध्ये (रोटेटिंग शिफ्ट) किमान एक वर्षाच्या पात्रता अनुभवासह.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha