Indian Navy Recruitment 2022 : जर तुम्हाला देशसेवा करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी आहे. भारतीय नौदल 1531 ट्रेड्समैन स्किल्ड पदांसाठी भरती करत आहे. या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 22 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.


रिक्त जागांचा तपशील :


अनारक्षित श्रेणी : 697 पदं
EWS प्रवर्ग : 141 पदं
ओबीसी प्रवर्ग : 385 पदं
SC प्रवर्ग : 215 पदं
ST प्रवर्ग : 93 पदं


वेतन 


नौदलात ट्रेडसमनच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 2 अंतर्गत 19,900 ते 63,299 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.


वयोमर्यादा


भारतीय नौदलात ट्रेडसमन पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावं. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार, उच्च वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल.


निवड प्रक्रिया


अर्जांची तपासणी, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.


शैक्षणिक पात्रता


भारतीय नौदल भरतीसाठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण झालेला असावा. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे, तसेच त्यांच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.


याप्रमाणे अर्ज करा



  • सर्व प्रथम joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या 

  • त्यानंतर नोंदणी करा

  • लॉगिन करून फॉर्म भरा

  • संबंधित कागदपत्रं अपलोड करा

  • फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा


महत्त्वाच्या इतर बातम्या :