​Indian Coast Guard Recruitment 2022: जर तुमच्यातही देशसेवा करण्याची जिद्द असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय तटरक्षक दलाने अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट indiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना विहित नमुन्यातच अर्ज करावा लागेल. अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियाद्वारे गट सी च्या स्टोअर कीपरच्या 2 आणि लस्करच्या 3 पदांची भरती केली जाईल.


शिक्षण पात्रता 


अधिसूचनेनुसार, या भरतीअंतर्गत स्टोअर कीपरच्या  (Store Keeper) पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असावा. तर लस्कर या पदांसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा 


या भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, स्टोअर कीपर पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे. तर लस्करसाठी ते 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान आहे. मात्र सरकारी निकषांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत मिळेल.


निवड प्रक्रिया


या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि ट्रेंड टेस्टच्या (Trade Test) आधारे केली जाईल. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांना किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या