Maharashtra Total Number Of Vacant Seats According To RTI : महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक सरकारी विभागामध्ये बहुतांश पदं रिक्त असल्याचं माहिती अधिकारातून (RTI) समोर आलं आहे. महाराष्ट्रात विविध सरकारी विभागात (Maharashtra Government Departments)  2 लाख 44 हजार पदं रिक्त आहेत. जिल्हा परिषद आणि इतर विभागात ही सर्व पदे रिक्त आहेत. आरटीआयच्या माध्यमातून आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याने विचारले होते की, महाराष्ट्र सरकारी नोकऱ्यांतर्गत किती पदांची भरती होऊ शकते आणि सध्या किती पदे रिक्त आहेत.


एकूण इतक्या पदांवर भरतीसाठी मंजुरी
माहिती अधिकाराच्या या अहवालात इतरही अनेक माहिती समोर आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांमध्ये एकूण 10 लाख 70 हजार 840 पदांवर नियुक्ती करण्यासाठी परवानगी आहे. त्यापैकी 8 लाख 26 हजार 435 पदं भरली असून 2 लाख 44 हजार 405 पदं रिक्त आहेत.


माहिती अधिकारातून उघड
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी 11 मे रोजी महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत सर्व श्रेणीतील पदांवरील मंजूर पदे आणि रिक्त पदांची माहितीसाठी अर्ज दाखल केला. याच्या उत्तरात प्रशासन विभागाने 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या रिक्त पदांचे तपशील दिले आहेत.


कोणत्या विभागात किती पदे रिक्त आहेत?
गृह विभागातील एकूण मंजूर पदे 2 लाख 92 हजार 820 असून त्यापैकी 46 हजार 851 रिक्त आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एकूण मंजूर पदे 62 हजार 358 असून त्यापैकी 23 हजार 112 पदं रिक्त आहेत. इतरही अनेक विभाग मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या जास्त असल्याचंही या अहवालात समोर आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या