Aryan Khan Case : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) सहा जणांना क्रुझ ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. एनसीबीच्या एसआयटीने विशेष एनडीपीएस न्यायालयात 6000 पानांचे आरोपपत्र दाखल केले, ज्यात एनसीबीने सांगितले की, त्यांना असा कोणताही पुरावा सापडला नाही ज्याच्या आधारावर आर्यन खानचे नाव आरोपपत्रात ठेवले जाऊ शकते. या आरोपपत्रात 20 आरोपींऐवजी केवळ 14 आरोपींची नावे नोंदवण्यात आली आहेत. एनसीबीने सांगितले की, त्यांना 6 आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही, ज्यामुळे या प्रकरणात त्यांची काही भूमिका असल्याचे सिद्ध होऊ शकते, त्यामुळेच त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.


कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपपत्रात समोर आले आहे की, अरबाज मर्चंटला आर्यन खानने ड्रग्ज आणू नका असे बजावले होते. तसेच, एनसीबी खूप सक्रिय झाली आहे आणि जर त्याने तसे केले, तर तो अडचणीत येऊ शकतो, असे देखील सांगितले होते. आर्यन खानचा इंटरनॅशनल ड्रग सिंडिकेटशी संबंध असल्याचे आणि या प्रकरणात त्याचा कोणताही सहभाग होता, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही, असेही एनसीबीने स्पष्ट केले आहे.


आर्यन खानने दिली गांजा सेवनाची कबुली!


क्रुझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान एनसीबी अधिकाऱ्यासमोर आर्यनने स्वेच्छेने केलेले वक्तव्य एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. आर्यन खानने आपल्या निवेदनात आपले दोन मोबाईल क्रमांक दिले आहेत. एक नंबर तो कॉलिंगसाठी वापरतो आणि दुसरा नंबर व्हॉट्सअॅपसाठी वापरतो. व्हॉट्सअॅपसाठी वापरण्यात आलेला नंबर हा अमेरिकेचा आहे.


आर्यन खानने एनसीबी अधिकारी आशिष रंजन यांच्यासमोर कबूल केले की, 2018 मध्ये त्याने पहिल्यांदा गांजा सेवन केला होता, तेव्हापासून तो गांजा वापरत आहे. 2018 मध्ये आर्यन अमेरिकेत ग्रॅज्युएशन करत होता. आर्यनने अधिकाऱ्याला सांगितले की, त्याला त्यावेळी झोप येत नव्हती आणि इंटरनेटवर वाचले होते की, गांजा खाल्ल्याने निद्रानाश बरा होऊ शकतो, म्हणूनच त्याने गांजा घेणे सुरू केले होते. आर्यनने सांगितले की, तो अरबाज मर्चंटला गेल्या सात-आठ वर्षांपासून ओळखतो. अरबाज गांजा आणि चरस सेवन करतो. आर्यनने असेही सांगितले की, त्याला चरस फारसे आवडत नाही, पण त्याने अरबाजच्या सांगण्यावरून कधी-कधी चरसही चाखला आहे.


क्रुझ टर्मिनलवर पोहोचल्यावर काय काय घडले?


आर्यनने आपल्या निवेदनात पुढे सांगितले की, तो त्याचा मित्र प्रतीक, मानव, अरबाज यांच्यासह मर्सिडीज कारमध्ये बॅलार्ड पिअरच्या ग्रीन गेटवर पोहोचला. त्या मर्सिडीज कारचा चालक मिश्रा नावाचा कोणीतरी व्यक्ती होता. आर्यनने सांगितले की, आम्ही दुपारी 1.30च्या सुमारास ग्रुप पार्टीसाठी क्रुझ टर्मिनलवर पोहोचलो. अरबाजने सांगितले होते की, तो क्रूझवर चरस आणणार आहे. आर्यन खानला 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे चेकिंग पॉईंट ओलांडताना अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांनी थांबवले. आर्यन खानची समीर वानखेडेशीही ओळख झाली आणि ते एनसीबीचा राजपत्रित अधिकारी असल्याचे सांगितले. यासोबतच आर्यन खानला एनडीपीएस कायद्यांतर्गत त्याच्या अधिकारांबाबतही सांगण्यात आले. यावेळी आर्यन खानकडे चौकशी केली असता आर्यनकडून कुठलेही ड्रग्ज सापडले नाही. आर्यन खानने स्वेच्छेने आपला मोबाईल एनसीबी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.


आर्यनच्या फोनवरील काही मेसेज तपासल्यानंतर अधिकाऱ्याने विचारले की, तो अरबाज मर्चंटला ओळखतो का? त्यावर आर्यन 'हो' म्हणाला. त्याला नार्कोटिक्स ड्रग्जबद्दल माहिती आहे का? असे विचारले असता आर्यन म्हणाला की, तो अंमली पदार्थ खातो पण फक्त गांजा आणि चरस. आर्यन खानने आपल्या जबाबात म्हटले की, त्याच्यासमोर अरबाज मर्चंटने एनसीबी अधिकारी आशिष रंजन यांच्याकडे चरसचा एक छोटासा साठा सुपूर्द केला. अरबाजकडून जप्त केलेला चरस क्रूझवर सेवनासाठी आणला गेला होता, असा खुलासा आर्यनने केला आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या अरबाजकडून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी टेस्टिंग किटच्या सहाय्याने चरसची चाचणी केली आणि तो चरस साठा जप्त केला.


ड्रग्ज चॅटबद्दल खुलासा


आर्यन खानने आपल्या जबाबात सांगितले की, त्यानंतर त्याची आणि त्याच्या मित्रांची केबिनमध्ये कसून तपासणी करण्यात आली. काही वेळाने NDPS च्या कलम 67 अंतर्गत नोटीस देण्यात आली आणि स्वेच्छेने आपले म्हणणे मांडण्यास सांगितले गेले. जेव्हा, आर्यन खानला व्हॉट्सअॅप ड्रग्ज चॅटबद्दल विचारण्यात आले, तेव्हा आर्यन खानने कबूल केले की, एनसीबीच्या हाती असलेल्या चॅट्स त्याने केल्या होत्या. आर्यन म्हणाला की, त्याने त्याचा मित्र अचित कुमार याच्याशी चॅट केली आहे, जी पोकर गेम आणि ड्रग्ज बद्दल आहे. आर्यनने असेही सांगितले की, अचित कुमारकडे माझे 80 हजार रुपये आहेत, जे परत करण्यात तो असमर्थ आहे. त्याबदल्यात आर्यनने त्याच्याकडे जास्त प्रमाणात गांजा मागितला होता. वांद्रे आणि पवई भागातील ड्रग्ज सप्लायरला अचित कुमार ओळखत होता आणि त्यामुळे तो आर्यनला ड्रग्ज पुरवू शकला असता.


एनसीबी मुंबईचे अधीक्षक विश्व विजय सिंह यांनी आर्यन खानवर एनडीपीएसच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत 3 ऑक्टोबर 2021 रोजी ड्रग्ज व्हॉट्सअॅप चॅट, त्याची कबुलीजबाब, अरबाज मर्चंटजवळ सापडलेली ड्रग्ज, आर्यन ज्याच्यासोबत रूम शेअर करणार होता तो मित्र, या पुराव्यांसह त्याला अटक केली. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता आर्यन खानला त्याच्या अटकेची माहिती देण्यात आली आणि त्याला अटक मेमो देण्यात आला ज्यावर आर्यन खानची स्वाक्षरी होती. आर्यनने त्याच्या कुटुंबीयांना या अटकेची माहिती दिली. या अटकेचा अहवाल NCB अधिकारी विश्व विजय सिंह यांनी NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सादर केला.


विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे तपासावर प्रश्नचिन्ह


विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, कर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एसआयटी यांनी न्यायालय किंवा एनसीबीचे न्यायाधीश म्हणून काम करू नये. अशाप्रकारे क्लीन चिट दिल्यानंतर एनसीबीच्या तपासावर प्रश्न निर्माण होऊ शकतात.


कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या एसआयटीने ज्या पद्धतीने तपास केला, तो कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास अतिशय आक्षेपार्ह आहे. एसआयटीला ही भूमिका दिली होती का? एनसीबीच्या एसआयटीला न्यायालयाचा निर्णय देण्याचा अधिकार आहे का?, असा सवाल निकम यांनी उपस्थित केला होता. एजन्सीच्या तपासात केवळ प्रसिद्धीसाठी सर्वकाही सुरू असल्याचे दिसते आणि हे चुकीचे आहे. तपासात चूक कशी झाली? मला हे पहायचे आहे, आणि हो यामुळे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढू शकतात की नाही, मला माहीत नाही. मात्र, तपास यंत्रणा ज्या पद्धतीने काम करत आहे, ते कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही, असेही ते म्हणाले.


कोण कोणाची नावं आली समोर?


कार्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात NCB ने या बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. 2 ऑक्टोबरला NCB ने कर्डिलिया क्रुझ वर छापा टाकला होता, तिथे 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर NCB ने आर्यन खानला अटक केली होती. त्यावेळी ग्रीन गेटजवळ त्यांच्याकडून एकूण 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या जप्त करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला होता. आर्यन खान, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंह, मोहक जैस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा आणि अरबाज मर्चंट अशी अटक करण्यात आलेल्या 8 जणांची नावे आहेत.


त्यावेळी एनसीबीने दावा केला होता की, काही आरोपी त्यांना मिळालेल्या व्हॉट्सअॅप चॅटवरून ड्रग्ज पुरवठादार आणि पेडलर यांच्या संपर्कात होते. आर्यन खानच्या मोबाईलमधून काही वादग्रस्त माहिती सापडल्याचा दावाही एनसीबीने त्यावेळी केला होता. त्यावेळी आर्यन आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात असल्याची शंका एनसीबीने व्यक्त केली होती. त्याच तपासादरम्यान NCB ने आणखी लोकांना अटक केली, ज्यांची नावे अब्दुल कादिर अब्दुल शेख, श्रेयश नायर, मनीष राजगर्या आणि अवीन साहू अशी आहेत. यानंतर NCB ने एक एक करून 20हून अधिक लोकांना अटक केली.


नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप


दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत एनसीबीच्या या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. एनसीबीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी SET ची स्थापना केली होती. क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र पंच प्रभाकर शैल यांनी सेलवर आरोप केला होता की, सॅम डिसूझा आणि केपी गोसावी हे 25 कोटी रुपयांच्या डीलबद्दल बोलत होते असे त्यांनी ऐकले होते, ज्यातून एनसीबीने 8 कोटी रुपये घेतले होते. हे पैसे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते.


केपी गोसावीने आर्यन खानवर कायदेशीर न करू देण्यासाठी पूजा ददलानीकडून पैसे घेतले. सॅम डिसूझा यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात सांगितले की, त्यानेच केपी गोसावीची पूजा ददलानीशी ओळख करून दिली होती. आर्यनकडून त्याला कोणतेही ड्रग्ज मिळाले नाही आणि तोच यात मदत करू शकतो. त्याला मदत म्हणून गोसावीने सॅमला पूजा दादलानीशी त्याची ओळख करून देण्यास सांगितले होते. जेव्हा सॅमला गोसावी फसवणूक करत असल्याचे कळले, तेव्हा त्याने ते सर्व पैसे त्याच्याकडून परत घेतले आणि पूजा दादलानीला परत दिले.


सॅमने मुंबई पोलिसांना सांगितले होते की, सुनील पाटील यांनी त्याच्याशी संपर्क साधला होता आणि आपण एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत का? असे विचारले होते. त्यानंतर सॅमने त्याला एनसीबी अधिकाऱ्याचे नाव पाठवले होते. पाटील यांनी सॅमला सांगितले की, कर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात केपी गोसावी आणि मनीष भानुशाली नावाचे दोन लोक त्याच्याशी संपर्क साधतील.


2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सॅम ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये होता, तेव्हा सुनील पाटील यांनी त्याला सांगितले की, क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एका अतिशय प्रभावशाली व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. सुरुवातीला सॅम म्हणाला की, तो व्यस्त असल्यामुळे तो जाऊ शकत नाही, पण सुनील पाटील यांनी अनेकवेळा विनवणी केल्याने ते ग्रीन गेटकडे गेले.


ग्रीन गेट येथे त्यांना मनीष भानुशालीला भेटला आणि केपी गोसावी यांनी सॅमची एनसीबी अधिकाऱ्यांशी ओळख करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. इथेच गोसावीने त्याला सांगितले की, आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. यानंतर सॅम यांनी पाटील यांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर पाटील यांनी त्यांना गोसावींच्या मागे जाण्यास सांगितले, यादरम्यान गोसावी सतत पाटील यांच्या संपर्कात होते.


केपी गोसावीने पाटील यांना सांगितले की, आर्यनला पूजा ददलानीशी बोलायचे आहे आणि त्याच्याकडून ड्रग्स सापडले नाहीत, तो निर्दोष आहे. यानंतरच गोसावी सॅमला सांगतो की आर्यनला यातून सुटका मिळू शकते. यासाठी पूजा दादलानीशी संपर्क करावा लागेल. ज्यानंतर, सॅम एका मैत्रिणीच्या मदतीने पूजाशी संपर्क साधतो आणि तिला लोअर परेलमध्ये भेटतो. सॅमने ददलानीची गोसावीशी ओळख करून दिली. गोसावीने पूजा दादलानीला आर्यनचे नाव नसलेली यादी दाखवली आणि म्हणाला की, आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, त्यामुळे आर्यनला या परिस्थितीतून बाहेर काढता येईल.


सॅमला 3 ऑक्टोबर रोजी आर्यनवर गुन्हा दाखल झाल्याचे समजले. त्यानंतर त्याने पाटील यांना फोन केला, तेव्हा पाटील यांनी गोसावीने पूजा दादलानी यांच्याकडून 50 लाख रुपये घेतल्याचे सांगितले. गोसावी हा फसवणूक करणारा व्यक्ती असल्याची बातमी सॅमला समजली आणि त्यानंतर सॅमने गोसावीकडून पैसे घेऊन ते पूजा दादलानीला परत केले. पूजा ददलानी यांनी तक्रार न दिल्यामुळे त्यांना वसुलीचा गुन्हा दाखल करता आला नाही, असे मुंबई पोलिसांनी त्यावेळी सांगितले होते.


सत्यमेव जयते : आर्यन खानचे वकील सतीश माने शिंदे


आर्यन खानचे वकील सतीश माने शिंदे यांनी आपले वक्तव्य जारी केले आणि सांगितले की, आर्यन खानची अटक आणि 26 दिवसांसाठी ताब्यात घेणे अधिक अवास्तव होते. विशेषत: त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज, कोणत्याही प्रकारचे पुरावे, कोणत्याही प्रकारची कोणतीही सामग्री किंवा कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे आढळून आले, तरीही ही कारवाई करण्यात आली. संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा वस्तुनिष्ठपणे तपास केला आणि पुरेशा पुराव्यांअभावी आर्यन खानविरुद्ध तक्रार न नोंदवण्याचा निर्णय घेतला याचा आम्हाला आनंद आहे. सत्यमेव जयते.


NCB कडे कोणताही पुरावा नव्हता!


क्लीन चिट देण्यात आलेल्या 6 आरोपींपैकी अवीन शाहू देखील एक आहे.. शाहूच्या वकील सना रईस खान यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, त्या पहिल्या दिवसापासून सांगत होत्या की शाहू निर्दोष आहे, तरीही त्याला 22 दिवस तुरुंगात घालवावे लागले आणि कोर्टाने जामिनावर सोडलेला शाहू हा पहिला व्यक्ती आहे. शाहू त्या जहाजावर पाहुणा म्हणून गेला होते आणि ज्या दिवशी छापा पडला, त्या दिवशी त्याला अटक करण्यात आली नाही. त्याला ज्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती, ते सिद्ध करण्यासाठी NCB कडे कोणताही पुरावा नव्हता.


कार्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणातील आरोपी मुनमुन धामेचाचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की, हे संपूर्ण प्रकरण बोगस आहे. मुनमुनजवळ काहीही सापडले नाही, ते सापडले ते जमिनीवर होते. आर्यन 26 दिवस तुरुंगात होता आणि आता त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत, त्यामुळे आता तो कारवाई करण्याची मागणी करू शकतो.


संबंधित बातम्या


Cruise Drugs Case : समीर वानखेंडेंच्या अडचणी वाढल्या, चुकीच्या पद्धतीने तपास केल्याबद्दल केंद्र सरकार करणार कडक कारवाई


Cruise Ship Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचीट; 14 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल