Indian Army Jobs 2022 : आर्मी पोस्टल सर्विस विंग, ब्रिगेड ऑफ द गार्ड्सने गट क पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार अधिसूचनेच्या तारखेपासून 3 आठवड्यांच्या आत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीद्वारे, वॉशर मॅनच्या 1 पद आणि गार्डनरच्या 1 पदांची नियुक्ती केली जाईल.
वेतन
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 1 अंतर्गत 18,000 ते 56,900 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
शैक्षणिक पात्रता
आर्मी पोस्टल सर्विस विंगमधील या ग्रुप सी पदांसाठी भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
या भरती अंतर्गत या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्ष असणं आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार, ओबीसी उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत 3 वर्षांची विशेष सूट असेल.
निवड प्रक्रिया
वॉशर मॅन आणि गार्डनरच्या पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे केली जाईल. उमेदवार अधिक तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विंग कमांडर, एपीएस विंग, ब्रिगेड ऑफ गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कॅम्पटी, जिल्हा - नागपूर, महाराष्ट्र - 441001 येथे पाठवावे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : कंस्ट्रक्शनपासून ते इलेक्ट्रिकल विभागात नोकरीची संधी, वाचा डिटेल्स
- Job Majha : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, अर्जासाठी उरले दोन दिवस
- Job Majha: बँक ऑफ बडोदा आणि SIDBI मध्ये मोठी भरती सुरू; असा करा अर्ज
- नौदलात 1531 पदांसाठी बंपर भरती, प्रतिमाह 60 हजारांहून अधिक वेतन मिळवण्याची संधी, कसा कराल अर्ज?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha