Indian Air Force Recruitment 2022 : भारतीय हवाई दलात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय हवाई दलाने अनेक गट क (Group C) पदांची भरती केली आहे. गट क च्या या भरती अंतर्गत कुक, हाऊस कीपिंग स्टाफ या पदांची भरती केली जाणार आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवार ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरती मोहिमेद्वारे हवाई दलातील गट क मधील 15 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये आया/वॉर्ड असिस्टंटच्या 2 पदे, कुकच्या पदासाठी 9 जागा, हाऊस किपिंग स्टाफची 2 पदे आणि सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या 2 पदांचा समावेश करण्यात आला आहे.
शैक्षणिक पात्रता :
- वॉर्ड असिस्टंट आणि हाऊस कीपिंग स्टाफच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.
- सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या पदासाठी, उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा आणि हलकी आणि जड वाहने चालविण्यासाठी सिव्हिल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
- कुकच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण आणि एक वर्षाच्या अनुभवासह कॅटरिंगमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.
असा करा अर्ज :
तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही एअर फोर्स स्टेशनवर अर्ज करू शकता. यासाठी उमेदवारांनी संबंधित कागदपत्रांसह अर्ज (इंग्रजी/हिंदी) संबंधित हवाई दल स्टेशनला सामान्य पोस्टाने पाठवणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या :