Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
बृहन्मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पश्चिम रेल्वे आणि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, आणि अर्ज कसा व कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
बृहन्मुंबई महानगरपालिका
पोस्ट - समुदाय संघटक (community organiser)
शैक्षणिक पात्रता - B.A./ BSW, 2 वर्षांचा अनुभव, मराठीचं ज्ञान, MSCIT उत्तीर्ण
एकूण जागा - 113
अर्ज पाठवण्याचा पत्ता - सहायक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, पाचवा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- 400028
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022
तपशील - portal.mcgm.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर For prospects मध्ये careers -all वर क्लिक करा. recruitment मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
एकूण 64 जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट - उद्यान अधिकारी
शैक्षणिक पात्रता - B.Sc (ऍग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर), 5 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 12
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 19 जून 2022
तपशील - www.pcmcindia.gov.in
दुसरी जागा- माळी
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, माळी कामाचा कोर्स, १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा - 52
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण- पिंपरी चिंचवड
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 19 जून 2022
तपशील - www.pcmcindia.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर भरतीवर क्लिक करा. भरती जाहिरात पाहा... यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
पश्चिम रेल्वे, मुंबई
याठिकाणी वेस्टर्न रेल्वे हॉस्पिटलमध्ये भरती होत आहे.
पोस्ट - हॉस्पिटल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता - 10वी पास, हॉस्पिटलमधल्या कामांचा अनुभव
एकूण जागा - 36
वयोमर्यादा - 18 ते 33 वर्ष
नोकरीचं ठिकाण - मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जून 2022
तपशील - wr.indianrailways.gov.in
कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.
पोस्ट - कार्यकारी, प्रशिक्षक, कायदा अधिकारी
शैक्षणिक पात्रता - कार्यकारीसाठी CA/ICWA/ ICMA, प्रशिक्षक पदासाठी पदवीधर, कायदा अधिकारी पदासाठी LLB, LLM
एकूण जागा - 18 (यात कार्यकारी पदासाठी 10 जागा, प्रशिक्षक पदासाठी 4 जागा, कायदा अधिकारी पदासाठी 4 जागा आहेत.)
वयोमर्यादा - कार्यकारी पदासाठी 40 वर्षांपर्यंत, कायदा अधिकारी पदासाठी 35 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण - कराड, सातारा, सांगली, पुणे
अर्ज पाठवण्याचा पत्ता - मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड (शेड्युल्ड बँक), मुख्य कार्यालय: 516/2, शनिवार पेठ, शाहू चौक, कराड 415110
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 30 जून 2022
तपशील - www.karadurbanbank.com