मुंबई : देशभरात लाखो तरुण-तरुणी सरकारी नोकरी (Government Job) मिळावी म्हणून जीवाचं रान करतात. दिवसरात्र अभ्यास करून वेगवेगळ्या परीक्षा देऊन यातील मोजकेच विद्यार्थी सरकारी नोकर होतात. मात्र आता फक्त दहावी पास असणाऱ्या तरुणांना सरकारी नोकर होण्याची नामी संधी आली आहे. भारतीय डाक विभागात (India Post Department) नोकरी मिळाल्यास तरुणांना तब्बल 83 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरावा
भारतीय डाक विभागाने ड्रायव्हर (चालक) या पदासाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे. या पदासाठी अर्ज करायचा असल्यास भारतीय डाक विभागाच्या indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा लागेल. भारतीय डाक विभागाकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
किती पदांसाठी भरती
भारतीय डाक विभागात नोकरी करायची इच्छा असेल तर तरुण येत्या 16 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. एकूण 27 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
27 पदांसाठी आरक्षण काय?
खुला प्रवर्ग– 14 पदईडब्ल्यूएस – 01 पदओबीसी – 06 पदएससी – 04 पदएसटी – 02 पदएकूण पदांची संख्या– 27
वयाची अट काय?
या जागेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 27 असणे गरजेचे आहे. 27 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे तरुण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करू कणार नाहीत.
पगार काय मिळणार?
भारतीय डाक विभागात ड्रायव्हर या पदासाठी तुमची निवड झाल्यास तुमचा पगार 19900 ते 83200 रुपया एवढा असू शकतो.
शिक्षणाची अट काय?
ड्रायव्हर पदासाठी चालू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी फक्त 10 पर्यंतचे शिक्षण झालेले असावे, अशी अट आहे. विशेष म्हणजे या भरतीप्रक्रियेत सामील व्हायचे असेल तर अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. म्हणजेच परीक्षा शुल्क शून्य असेल.
हेही वाचा :
मोठी बातमी! नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर स्वस्त; बँकेच्या नियमांतही बदल
करप्रणालीत बदल कसा करावा? नव्या वर्षात हे शक्य आहे का? जाणून घ्या सविस्तर
प्राप्तिकर आणि TDS यात नेमका फरक काय? 'हे' वाचा गोंधळ दूर होईल!