कोल्हापूर: रागावर नियंत्रण ठेवा, असा सल्ला आपण हमखास ऐकतो. लहानसहान गोष्टींवरुन राग अनावर झाल्यामुळे हातून मोठ्या चुका घडल्याची उदाहरणंही आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. अशीच एक घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime News) घडली आहे. पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापुरातील साळोखे पार्कमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलवर पत्नीशी बोलताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून जन्मदात्या आईची मुलाने हत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शहनाज मुजावर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.पत्नीसोबत बोलत असताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून हत्या करण्यात आली आहे. हत्या करणारा मुलगा सादिक मुजावरला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. आईच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर सुऱ्याने वार केले आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. आईचा जागीच मृत्यू झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सादिक मुजावरला याचे कुटुंबातील अनेक सदस्यांसोबत वाद होते. त्यामुळे कोल्हापूर पोलिस स्थानकात त्याच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. आई आणि बहिणीसोबत देखील अनेक वेळा त्याचे वाद झाले आहेत. काल रात्री सादिक पत्नीसोबत बोलत होता. पत्नीसोबत बोलत असताना आई मध्येच बोलल्याणे आई आणि मुलामध्ये वादाला सुरुवात झाली. माझ्या पत्नीशी मी बोलत असताना तू मघ्येच का बोलली?असे म्हणत दोघांमध्ये वाद सुरू झाले. हे वाद इतके विकोपाला गेले की संतापलेल्या सादिकने आईवर सुऱ्याने थेट हल्ला केला. वादात सादिकने बेसावध असलेल्या आईच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर सुऱ्याने वार केले. हे वार इतके खोल होते की, प्रचंड रक्तस्त्रावामुळे आईचा जागीच मृत्यू झाला. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तपास पोलीस करत आहेत
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सादिक मुजावर विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. फक्त आई मध्ये बोललल्याने हत्या झाली की इतर काही कारणामुळे हत्या झाली? याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा :