Income Tax Department Vacancy 2024 : आयकर विभागाकडून (Income Tax) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आयकर विभाग मुंबई प्रदेश, क्रीडा कोटाअंतर्गत निरीक्षक, लघुलेखक, कर सहाय्यक आणि इतर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत आणि क्रीडा कोट्यातील भरतीमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत, त्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. आयकर विभागाच्या Incometaxmumbai.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, तिथे दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अर्ज भरता येईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 निश्चित केलेल्या अंतिम तारखेपर्यंत भरता येईल.
Income Tax Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील
या भरतीद्वारे आयकर विभाग मुंबई प्रदेश अंतर्गत एकूण 291 रिक्त जागांवर उमेदवारांची भरती केली जाईल. पोस्टनिहाय भरती तपशील खालीलप्रमाणे आहेत.
- इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) : 14 पदे
- स्टेनोग्राफर ग्रेड II (स्टेनो) : 18 पदे
- कर सहाय्यक (TA) : 119 पदे
- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 137 पदे
- कॅन्टीन अटेंडंट (CA) : 3 पदे
Income Tax Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदानुसार मॅट्रिक किंवा समकक्ष किंवा 10+2 किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय क्रीडा कोटा अंतर्गत असणे आवश्यक आहे.
Income Tax Recruitment 2024 : वयोमर्यादा
या भरतीअंतर्गत विविध पदानुसार उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25/27/30 वर्षे असणे, आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. पात्रतेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.
Income Tax Recruitment 2024 : अर्ज फी
अर्ज भरताना उमेदवारांना शुल्कही जमा करावे लागेल. सर्व उमेदवारांसाठी 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :