Masik Shivratri 2024 : हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री (Shivratri) साजरी केली जाते. त्यानुसार,  2024 सालातील पहिली मासिक शिवरात्री 9 जानेवारी, मंगळवार, म्हणजेच आज आहे. यंदा याच दिवशी प्रदोष व्रताचा योग देखील जुळून आला आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. हिंदू धर्मात प्रदोष व्रतालाही खूप महत्त्वाचं मानलं जातं. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही त्रयोदशी तिथींना पाळलं जातं.


भगवान शिवाला समर्पित या दोन तिथींना विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सर्व दुःख आणि त्रासांपासून मुक्ती मिळते, तसेच जीवनात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे. त्यात या वर्षी प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीला अतिशय शुभ संयोग घडत आहे. 


प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी 


वर्ष 2024 ची पहिली मासिक शिवरात्री आणि प्रदोष व्रत   एकाच दिवशी आलं आहे. मंगळवारी, 9 जानेवारी 2024 रोजी प्रदोष व्रत पाळलं जात आहे, आज मासिक शिवरात्री देखील आहे. अशाप्रकारे आज उपवास केल्यास दुप्पट फळ मिळेल. हे दोन्ही व्रत भोलेनाथासाठी ठेवले जातात. या शुभ दिवशी केलेला एक उपाय तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करेल.


प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री 2024 पूजा मुहूर्त


पंचांगानुसार, प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त मंगळवार, 9 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 05.01 ते रात्री 08.24 पर्यंत असेल. मासिक शिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 9 जानेवारीच्या मध्यरात्री 12.01 ते 12.55 पर्यंत होता. मासिक शिवरात्रीच्या पूजेसाठी सुमारे 54 मिनिटांचा वेळ होता. वास्तविक, चतुर्दशीची मुख्य तिथी 9 जानेवारीला रात्री 10.24 पासून सुरू होईल, जी 10 जानेवारीला रात्री 08.10 पर्यंत असणार आहे.


हा एक उपाय दूर करेल सर्व समस्या


प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीच्या दिवशी विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्यासोबतच हनुमानाचीही पूजा केल्यास खूप फायदा होईल. हनुमानजी संकटनिवारक आहेत आणि हा विशेष योगायोग आज केवळ मंगळवारीच घडत आहे, त्यामुळे या दिवशी हनुमानाचीही पूजा केल्याने नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतील. तुमच्या जीवनातील सर्व दु:ख आणि त्रास दूर होतील, तुमची बिघडलेली कामं दुरुस्त होण्यास सुरुवात होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shivratri 2024 : आज नववर्षाची पहिली मासिक शिवरात्री खास! बनतोय अद्भुत योगायोग, भगवान शंकराची असेल या राशींच्या लोकांवर कृपा