Horoscope Today, May 28, 2022 : आज चंद्र भरणी नक्षत्र आणि मेष राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे आणि सूर्य वृषभ राशीत आहे. वृषभ, मिथुनसह काही राशींच्या लोकांना नवीन गुतंवणूक करताना काळजी घ्यावी लागणार आहे. अशावेळी योग्य अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...


मेष (Aries Horoscope) : मन प्रसन्न राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. अनावश्यक वाद टाळा. कोणतेही रखडलेले सरकारी काम आज पूर्ण होईल. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. इतरांसोबत बसून मोकळा वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले ठरेल. काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. कोणत्याही प्रकारची नवी गुंतवणूक करू नका. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.


वृषभ (Taurus Horoscope) : आज नवीन वाहन खरेदी करणार असाल, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमात मतभेद होऊ शकतात. धार्मिक कार्यात रस घ्याल. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी, त्याचे फायदे आणि तोटे यांचा विचार करा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.


मिथुन (Gemini Horoscope) : कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पालकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळेल. नोकरीच्या परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळेल. प्रेमात मतभेद होऊ देऊ नका. व्यवसायात काही अडचण येत असेल, तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.


कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस संमिश्र राहील. काही पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतील. आज सुरू केलेल्या नवीन कामात यश मिळेल. नोकरीत प्रगती अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ संभवतो. बोलण्यात संयम ठेवा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च जास्त होईल.


सिंह (Leo Horoscope) :  नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. अधिक धावपळ होईल. घरातील सदस्याच्या वागण्यामुळे तुम्ही नाराज राहू शकता. तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतो. कार्यालयात अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज कोणतीही नवीन खरेदी करू नका.


कन्या (Virgo Horoscope) : नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली, तर त्यात संयम बाळगावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. शिक्षणाशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात सामान्य लाभ होईल. काही नवीन लोकांची भेट होईल.


तूळ (Libra Horoscope) : उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. धनलाभ संभवतो. व्यावसायिकांना उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायात यश मिळेल. तुमचे काही विरोधक तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात, ज्यापासून तुम्हाला सावध राहावे लागेल. कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचे मत जाणून घ्या. व्यवसायात वाढ होईल.


वृश्चिक (Scorpio Horoscope) : कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पालकांच्या पाठिंब्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. मित्रांसोबत प्रवासाची योजना बनवू शकता. कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रगती शक्य आहे. अतिरिक्त उत्पन्नासाठी तुमच्या सर्जनशील कल्पनांचा आधार घ्या. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


धनु (Sagittarius Horoscope) : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढवण्याचे साधन मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. पैसे कमविण्याच्या अनेक संधी निर्माण होतील. घरातील काम थकवा आणणारे असेल आणि त्यामुळे मानसिक तणावाचे कारण बनू शकते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. उधार घेतलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल.


मकर (Capricorn Horoscope) : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. काही जुने आजार पुन्हा उफाळून येऊ शकतात. व्यावसायिक योजनांना चालना मिळेल. नोकरीशी संबंधित लोक कामाच्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणींसाठी त्यांच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकतात. अनावश्यक राग टाळा.


कुंभ (Aquarius Horoscope) : व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. नवीन व्यवसाय सुरू करता येईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. खर्चात वाढ होईल. मनःशांती राहील. आज सुरू केलेल्या कामात यश मिळेल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. वाहन किंवा घर घेणे फायदेशीर ठरेल. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. वाहन चालवताना निष्काळजीपणा करू नका.


मीन (Pisces Horoscope) : रोजगारासाठी इकडे-तिकडे भटकणाऱ्या लोकांना काही चांगली माहिती मिळू शकते. आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. परीक्षेची तयारी करून विद्यार्थ्यांना आज अपेक्षित निकाल मिळेल. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढू शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :