IDBI Bank Recruitment 2023 For Specialist Cadre Officer Posts: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच, IDBI बँकेनं अनेक स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. तुमची निवड झाल्यास दरमहा उत्तम वेतन मिळेल. ज्या उमेदवारांना या रिक्त जागांसाठी फॉर्म भरायचा आहे, ते बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. भरतीसंदर्भात सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या - idbibank.in तुम्ही या वेबसाईटवरुन या भरतीचे तपशील जाणून घेऊ शकता.
भरतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा
आयडीबीआय बँकेनं स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. त्यासाठी अद्याप अर्ज भरण्यास सुरुवात झालेली नाही. नोंदणी 9 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. अर्ज शुल्क देखील याच तारखांमध्ये भरावं लागेल. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका, वेळेत अर्ज भरा.
भरती प्रक्रियेत रिक्त पदांवर नियुक्ती
या भरती मोहिमेद्वारे एकूण 89 पदांची भरती केली जाणार आहे. ही पदं असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर इत्यादी पोस्टसाठी आहे. ही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या श्रेणींसाठी घेण्यात आली आहे. भरती प्रक्रियेच्या पात्रतेबाबत बोलायचं झालं तर, या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता पोस्टनुसार आहे. प्रत्येक पोस्टची माहिती मिळविण्यासाठी वेबसाईटवर दिलेल्या सूचना व्यवस्थित पाहा.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले उमेदवार भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा देखील पोस्टनुसार आहे आणि त्यानुसार बदलेल. साधारणपणे 28 ते 40 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. डेप्युटी मॅनेजरसाठी वयोमर्यादा 35 ते 45 वर्ष आहे.
वेतनश्रेणी
भरती प्रक्रियेत तुमची निवड झाल्यास, पदानुसार तुमचं वेतन ठरवलं जाईल. डेप्युटी मॅनेजर ग्रेड डीचे वेतन 1 लाख 55 हजार रुपयांपर्यंत आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक ग्रेड सी यांचं मासिक वेतन 1 लाख 28 हजार रुपये आहे. मॅनेजर ग्रेड बीचा पगार 98000 रुपयांपर्यंत आहे. तर, अर्ज शुल्क 1000 रुपये आहे. तसेच, SC, ST साठी 200 रुपये अर्जशुल्क आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
सर्वात आधी अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील आणि निवडक उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलावलं जाईल. यामध्ये वैयक्तिक मुलाखत, गटचर्चा अशा प्रक्रियांचा समावेश असेल. उमेदवाराला याबाबत माहिती दिली जाईल. अधिक अपडेट्ससाठी वेबसाइट तपासत राहा.