ICMR Recruitment 2022 : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ICMR मध्ये वैज्ञानिक-सी पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 5 जून रोजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत अर्ज करु शकतात. उमेदवार ICMR च्या recruitment.icmr.org.in या अधिकृत साइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.


रिक्त जागांचा तपशील


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे वैज्ञानिक-सी ची 18 रिक्त पदं भरली जातील.


शैक्षणिक पात्रता


अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्य कीटकशास्त्र विषयात प्रथम श्रेणीचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेची मदत घ्यावी.


वयोमर्यादा


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं जारी केलेल्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे कमाल वय 40 वर्ष असावं.


अर्ज शुल्क 


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं जारी केलेल्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 1500 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. 


अर्ज कसा कराल?



  • सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम ICMR च्या recruitment.icmr.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • त्यानंतर होमपेजवरील Apply लिंकवर क्लिक करा.

  • आता नोंदणी करा आणि नोंदणीसह पुढे जा.

  • त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.

  • शेवटी, उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची हार्ड कॉपी स्वतःकडे ठेवा. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :